शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,नाशकातले दोन बडे नेते शिंदे गटात सामील
शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत. सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील होत आहेत. आता यामध्ये नाशिकच्या आणखी दोन नेत्यांची भर पडली आहे.
नाशिक : शिंदे गटाकडून (Eknath Shinde) शिवसेनेला (Shiv sena) धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत. सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील होत आहेत. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भाऊलाल तांबडे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील ठाणे, नवी मुंबई आणि इतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे असणार आहे. त्यांनी त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना अपेक्षीत असे यश येताना दिसून येत नाहीये. दुसरीकडे शिंदे गटाकडून नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना देखील सुरुवात झाली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

