Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आणखी एक याचिका, नागरिकांच्या वतीनं दाखल करण्यात आली याचिका

| Updated on: Aug 17, 2022 | 6:21 PM

नागरिकांनी पुढाकार घेतल्याचं सांगितलं जात आहे. असीम सरोदे हे वकील आहेत. विश्वंभर चौधरी, रंजना बेलखोडे, सौरभ अशोकराव यांनी ही याचिका जनतेच्या नावानं दाखल केली आहे.

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आणखी एक याचिका, नागरिकांच्या वतीनं दाखल करण्यात आली याचिका
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आणखी एक याचिका
Follow us on

पुणे : एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात आणखी एक याचिका कोर्टात ( Court) दाखल करण्यात आली आहे. नागरिकांच्यावतीनं (Citizen) ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात मतदारांचसुद्धा मत कोर्टानं ऐकूण घ्यावं अशी विनंती केली. विश्वंभर चौधरी, रंजना बेलखोडे, सौरभ अशोकराव यांनी असीम सरोदे (Asim Sarode) यांच्यामार्फत याचिका दाखल केली. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाचं उल्लंघन झालेलं आहे, हे न्यायालयासमोर मांडलं जाणार आहे. या प्रकरणी 22 तारखेलाच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

दहाव्या परिशिष्टाचं उल्लंघन केल्याचा आरोप

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ते जरी शिवसेनेत असल्याचं सांगत असले, तरी मूळ शिवसेना ही ठाकरे यांची आहे. आता बहुसंख्य आमदार आणि खासदार आमच्या बाजूला असल्यामुळं आमचीचं शिवसेना असल्याचं ते सांगत आहेत. परंतु, सरकार स्थापन करताना घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचं उल्लंघन केलं. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

यांनी दाखल केली याचिका

शिवसेनेनं न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे सर्व सुरू असताना आता दुसरी याचिका दाखल करण्यात आली आहे. यात नागरिकांनी पुढाकार घेतल्याचं सांगितलं जात आहे. असीम सरोदे हे वकील आहेत. विश्वंभर चौधरी, रंजना बेलखोडे, सौरभ अशोकराव यांनी ही याचिका जनतेच्या नावानं दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालय 22 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे. यापूर्वी असीम सरोदे आणि अजिंक्य उदाने यांनी शिवसेनेच्या बंडखोरांविरोधात याचिका दाखल केली आहे. आपल्या कर्तव्याकडं दुर्लक्ष केल्याचं त्या याचिकेत म्हटलं होतं. आता पुन्हा नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं यावर कोर्ट काय निर्णय देते, हे पाहावं लागेल.

हे सुद्धा वाचा