Anurag Thakur : केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांचा FTIIमध्ये विरोध, ज्यांची वक्तव्ये विभाजन करणारे त्यांचे कॅम्पसमध्ये स्वागत नाही, विद्यार्थ्यांची भूमिका

| Updated on: May 05, 2022 | 10:12 PM

गेल्या काही दिवसांपासून अनुराग ठाकूर यांची वक्तव्ये ही सांप्रदायिक आणि समाजातच तेढ निर्माण करणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासह सातत्याने होणाऱ्या एफटीआयआयमधील फी वाढीचा विरोधही विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने केला. एफटीआयआय स्टुडंट फेडरेशननेही याला पाठिंबा दर्शवला.

Anurag Thakur : केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांचा FTIIमध्ये विरोध, ज्यांची वक्तव्ये विभाजन करणारे त्यांचे कॅम्पसमध्ये स्वागत नाही, विद्यार्थ्यांची भूमिका
अनुराग ठाकूर यांना FTII मध्ये काही विद्यार्थ्यांचा विरोध
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : पुण्यात एफटीआयआयमध्ये केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. ते एफटीआयआय (Film and Television Institute of India) परिसरात असेपर्यंत विद्यार्थी हातात पोस्टर्स आणि बॅनर्स घेऊन घोषणाबाजी करत राहिले. गेल्या काही दिवसांपासून अनुराग ठाकूर यांची वक्तव्ये ही सांप्रदायिक आणि समाजातच तेढ निर्माण करणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासह सातत्याने होणाऱ्या एफटीआयआयमधील फी वाढीचा विरोधही विद्यार्थ्यांनी (FTII students) यानिमित्ताने केला. एफटीआयआय स्टुडंट फेडरेशननेही याला पाठिंबा दर्शवला.

मंत्रालयातून मिळणाऱ्या निधीत कपात करण्याची धमकी

अनुराग ठाकूर यांची राजकीय विचारधारा आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या कार्याचा विरोध करत असल्याचे स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले. ठाकूर येण्यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून धमकी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. जर अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यात निदर्शने करण्यात आली तर मंत्रालयाच्या मार्फत संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिल्याचे स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले. हा लोकशाही अधिकारांवर आघात असल्याची भूमिका विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांशी योग्य प्रकारे चर्चा न केल्याचा आरोप

अनुराग ठाकूर कॅम्पसमध्ये आल्यानंतर त्यांच्याविरोधात मौन प्रदर्शन करण्यात आले. वारंवार विनंती केल्यानंतरही ठाकूर यांना भेटण्यासाठी केवळ दोनच मिनिटे मिळाली, असे या विद्यार्थी नेत्यांचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांनी कागदावर लिहून त्यांच्या मागण्या ठाकूर यांच्यासमोर ठेवल्या. यावर ठाकूर यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सरकारकडून सातत्याने सबसिडी मिळत असूनही आणि शार्ट टर्म कोर्समधून मोठे उत्पन्न मिळत असूनही एफटीआयआयचे प्रशासन दरवर्षी फीमध्ये 5 टक्क्यांनी वाढ करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यापूर्वीही सातत्याने हे मुद्दे उपस्थित करुनही यावर कोणताही तोडगा निघत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.