AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Statue of Equality: स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समानतेचे प्रतीक; अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर म्हणाले की, आज २१ वे शतक आहे, पण अनेक शतकांपूर्वी दिलेले विचार आजही या जगाला लागू पडतात. समानतेचे प्रतीक असलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची ही केवळ २१६ फूट उंचीची नाही तर देशाला आणि जगाला खूप मोठी ही देण आहे

Statue of Equality: स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समानतेचे प्रतीक; अनुराग ठाकूर
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 3:33 AM
Share

हैदराबादः हैदराबादमधील ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (Statue of Equality) येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) रविवारी पोहोचले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सर्व लोकांचे मनापासून आभार व्यक्त केले. अनुराग ठाकूर म्हणाले की, आज २१ वे शतक आहे, पण अनेक शतकांपूर्वी दिलेले विचार (Thought) आजही या जगाला लागू पडतात. समानतेचे प्रतीक असलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची ही केवळ २१६ फूट उंचीची नाही तर देशाला आणि जगाला खूप मोठी ही देण असून याचा मला आनंद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अनुराग ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले भारत हा महान यासाठी आहे की, आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. काही दिवसापूर्वी भारतातील काही माणसं विदेशात जाण्याची स्वप्नं बघत होती तर आता मात्र सगळा भारत या भूमीकडे पाहत आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते समाजसुधारक आणि अकराव्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले.

हा माझा मोठा बहुमान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, या पुतळ्याचे माझ्या हस्ते अनावरण होणे हा माझा मोठा बहुमान आहे. त्यांचा पुतळा बसवून चिन्ना जियर स्वामी यांनी नवा इतिहास रचला आहे. रामानुजाचार्य यांच्या या महामहोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.

महान अध्यायाशी जोडण्याचे भाग्य

या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुतळ्याच्यानिमित्ताने अध्यात्मिक ऊर्जा मिळत राहिल. या परिसराचे नाव रामनगर असणे हा खरच योगायोग आहे असंही त्यांनी मत व्यक्त केले. तेलंगणातील प्रत्येक भेट माझ्यासाठी महत्त्वाची असून आजच्या दौऱ्यात मला देशाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेच्या एका महान अध्यायाशी जोडण्याचे भाग्य मिळाले आहे. रामानुजाचार्य यांच्यामुळे या परिसराला अध्यात्मिक आणि सामाजिकतेचा मोठा वारसा लाभला आहे. तो नक्कीच या परिसराला आणि देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. देशातील हा एक महत्वाचा भाग आहे, अशा भागात रामानुजाचार्यांच्या पुतळ्याचे माझ्या हस्ते अनावरण होणे ही माझ्या आयुष्यातील मोठी आणि सुंदर घटना असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.