अर्जुन खोतकरांचं बंड थंडावलं, एका पदावर बोळवण

मुंबई : शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंडावलं आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर इच्छुक होते. मात्र, अखेर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना खोतकरांची समजूत काढण्यास यश मिळालं आहे. अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून […]

अर्जुन खोतकरांचं बंड थंडावलं, एका पदावर बोळवण
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंडावलं आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर इच्छुक होते. मात्र, अखेर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना खोतकरांची समजूत काढण्यास यश मिळालं आहे.

अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून लोकसभेसाठी मराठावाडा विभागाच्या समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पदावर अर्जुन खोतकर यांची बोळवण केल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, अर्जुन खोतकरांच्या माघारीची चर्चा असली, तरी अद्याप खोतकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शिवाय, खोतकरांच्या जालन्यातील घराबाहेर शिवसैनिकही जमले असून, खोतकरांच्या उमेदावारीसाठी घोषणा दिल्या जात आहेत.

भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल

भाजपने पहिल्या यादीतच जालन्यातील उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे. आज किंवा उद्या भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांचं आव्हान संपुष्टात आले आहे.

दानवे आणि खोतकरांचा वाद राज्यात तुफान गाजला. दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका केली. दानवेंविरोधात खोतकरांनी शड्डू ठोकला होता. दानवेंचा पराभव करणारच, अशा घोषणाही खोतकरांनी जालन्यातील सभांमधून जाहीरपणे दिल्या होत्या. मात्र, आता खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंना मोठा दिलासा मिळणार आहे.