
नवी दिल्ली: तामिळनाडूच्या (Tamilnadu) डीएमके सरकारने माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेत्या जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करणारा अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या माजी न्यायामूर्तीने हा अहवाल तयार केला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांना 2016मध्ये चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला (Sasikala) यांच्या भूमिकेची गहन चौकशी करण्याची गरज आहे. तसेच डॉक्टरांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, असं या माजी न्यायाधीशाने अहवालात म्हटलं आहे.
जस्टिस ए अरुमुघस्वामी आयोगाने हा अहवाल सादर केला आहे. जयललिता यांच्या विश्वासू व्हि.के. शशिकला यांनी आपली चूक मानली पाहिजे. याबाबत चौकशीचे आदेश दिले पाहिजे, असं या अहवालात म्हटलं आहे.
आयोगाने या प्रकरणात शशिकला यांच्यासह काही संदिग्ध व्यक्तींचं नाव घेतलं आहे. तसेच शशिकला आणि डॉक्टरांनीच जयललिता यांना मारल्याचे संकेतही या अहवालातून देण्यात आले आहेत.
जयललिता यांच्या मृत्यूवेळी शशिकला आणि जयललिता यांच्यात बेबनाव झाला होता. या काळात दोघींमधीली वाद वाढले होते. जयललितांच्या मृत्यूप्रकरणात शशिकला यांची काय भूमिका होती याची गहन चौकशी करण्याची गरज आहे, असं समितीने म्हटलं आहे.
या समितीने जयललिता यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही दोषी ठरवलं आहे. या डॉक्टराने जयललिता यांच्या आजारापणाची योग्य माहिती दिली नसल्याचं सांगितलं जातं.
जयललिता यांची अँजिओप्लास्टि केली गेली नाही. डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टि करण्याची सल्ला दिली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुमुघमस्वामी यांच्या एक सदस्यीय आयोगाची सप्टेंबर 2017मध्ये स्थापना करण्यात आली होती.
अरुमुघमस्वामी आयोगाने गेली पाच वर्ष जयललिता यांच्या मृत्यूची वेगवेगळ्या अँगलने चौकशी केली. यावेळी जयललिता यांचे सहकारी, नातेवाईक, अधिकारी आणि माजी मंत्र्यांची चौकशी करण्यात आली.
एवढेच न्हे तर रुग्णालयाकडूनही माहिती घेण्यात आली. एकूण 75 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. यात सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांशिववाय चेन्नई अपोलो रुग्णालयाचे डॉक्टर आणि चेन्नईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तसेच या चौकशी दरम्यान आयोगाने 158 लोकांशीही चर्चा केली.