Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:19 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 जाणून घेऊयात देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्यभरात पाऊस सुरू आहे. मात्र पुण्यात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. रात्री अडीचपर्यंत पुण्यात कोसळधार पाऊस झाला. पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली, मात्र अनेक भागात पाणी साचलं आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पाणी साचल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलं असून, प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर आणि पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं. पावसाचा जोर कमी झाल्यानं पहाटेपासून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Oct 2022 08:55 AM (IST)

    नाशिकमध्ये ड्रोन उड्डाणावरील बंदीची मुदत वाढवली

    नाशिक शहरात ड्रोन उड्डाणावरील बंदीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ

    पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आदेश

    आतापर्यंत एकूण 17 ड्रोन जप्त

    लष्करी आस्थापनांमध्ये अज्ञात ड्रोनची घुसखोरी झाल्याने दिले होते आदेश

  • 18 Oct 2022 08:30 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

    Marathi News LIVE Update

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

    आता लवकरच बोनस आणि वेतनही

    दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून महामंडळाला 45 कोटींची भेट

    एसटी कर्मचाऱ्यांना कमीतकमी अडीच हजार रुपये बोनस मिळणार

  • 18 Oct 2022 08:20 PM (IST)

    बदनामी प्रकरणी मुंबईत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

    Marathi News LIVE Update

    आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील बदनामी प्रकरण

    बदनामी प्रकरणी मुंबईत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

    सोशल मीडियातून बदनामी केल्याचे प्रकरण

    केरे पाटलांनी विष घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

  • 18 Oct 2022 07:57 PM (IST)

    ड्रोनचा वापर केल्यास शेतीत अमुलाग्र बदल

    Marathi News LIVE Update ड्रोनचा वापर केल्यास शेतीत अमुलाग्र बदल

    देशाचा जीडीपी दीड टक्क्यांनी वाढेल

    तर पाच लाख तरुणांच्या हाताला मिळेल रोजगार

    वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात दावा

  • 18 Oct 2022 07:30 PM (IST)

    शिंदे गटातील सरंपच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    Marathi News LIVE Update

    शिंदे गटातील सरंपच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखविला

    हे गोरगरिबांचे सरकार असल्याचे दाखवून दिले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

    निवडणुकीत विजयी सरपंच वर्षावर

  • 18 Oct 2022 06:49 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका

    Marathi News LIVE Update

    मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका

    राज्य सरकार याचिका दाखल करणार

    सरकार ठोठावणार पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

    मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत घेतला निर्णय

  • 18 Oct 2022 06:31 PM (IST)

    सौरव गांगुलीची इनिंग संपली, महिला IPL ची घोषणा, जाणून घ्या BCCI AGM मधल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल

    महिला IPL चे सामने कधी होणार? किती टीम्स असतील. सर्व डिटेल्स जाणून घ्या....वाचा सविस्तर....

  • 18 Oct 2022 05:48 PM (IST)

    T20 World Cup 2022: धक्कादायक पराभवानंतर अखेर श्रीलंकेची टीम पहिली मॅच जिंकली

    T20 World Cup 2022 मध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेला आजच्या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं, वाचा सविस्तर.

  • 18 Oct 2022 05:25 PM (IST)

    उभ्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार

    Marathi News LIVE Update

    उभ्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार

    देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    3 वर्षे मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांची भावना होती

    अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केलेली आहे

    NDRF च्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केल्याचा केला दावा

  • 18 Oct 2022 05:20 PM (IST)

    धारावीच्या विकासातील अडसर दूर

    Marathi News LIVE Update

    धारावीच्या विकासातील अडसर दूर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    दिल्लीत घेतली धारावीच्या पुनर्विकासासाठी वैष्णव यांची भेट

    समृद्धी महामार्गालगत हायस्पीड ट्रेन आणि कॉर्गो ट्रेनचे काम ही करणार

    मुंबई ते सोलापूर वंदे भारत रेल्वे सुरु करणार

    रेल कम रोड, असा वापर करण्याचे अश्विनी वैष्णव यांचे निर्देश

  • 18 Oct 2022 05:20 PM (IST)

    IND vs NZ T20 WC Warm up Matches Live Streaming: कधी, कुठे, कसा पाहू शकता भारत वि न्यूझीलंड सामना

    IND vs NZ T20 WC Warm up Matches Live Streaming: एका क्लिकवर जाणून घ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे डिटेल्स.

  • 18 Oct 2022 04:30 PM (IST)

    'गर्जा महाराष्ट्र' गीताला राज्यगीताचा दर्जा

    Marathi News LIVE Update

    'गर्जा महाराष्ट्र' गीताला राज्यगीताचा दर्जा

    गाण्यातील दोन कडवी राज्यगीतात घेतली जाणार

    मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

  • 18 Oct 2022 04:01 PM (IST)

    अंधेरी पोटनिवडणुकीतील माघारीवरुन भाजपवर टीका

    Marathi News LIVE Update

    अंधेरी पोटनिवडणुकीतील माघारीवरुन भाजपवर टीका

    पोटनिवडणुकीतून भाजपनं पळ काढला

    ठाकरे गटाला छळायचा भाजपचा प्रयत्न

    उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला पलटवार

    धनुष्यबाण गोठवंल तरी तुम्ही मशाल घेऊन निघाला आहात

    शिवसैनिकांची ठाकरे यांनी थोपटली पाठ

  • 18 Oct 2022 03:44 PM (IST)

    मिलिंद नार्वेकर यांच्याकडून जय शहा यांचे अभिनंदन

    भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) अध्यक्ष पदी रॉजर बिन्नी आणि सचिव पदी जय शाह यांची आज बिनविरोध निवड झाली.

    त्याबद्दल शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    मिलिंद नार्वेकर एमसीए कार्यकारिणी निवडणुकीत शरद पवार-आशिष शेलार गटातून सदस्य पदासाठी उमेदवार आहेत

  • 18 Oct 2022 03:34 PM (IST)

    T20 World Cup आधी जय शाहनी पाकिस्तानला दिला मोठा झटका

    पाकच कोट्यवधींच होणार नुकसान, वाचा सविस्तर....

  • 18 Oct 2022 03:23 PM (IST)

    पुरावे असल्यानंच यंत्रणा चौकशी करतात

    Marathi News LIVE Update

    वैभव नाईकांची संपत्ती 7 ते 8 कोटींनी वाढली

    आता तर मालमत्तेत 25 कोटींची वाढ

    तक्रारदार प्रदीप भालेकर विनायक राऊतांचाच माणूस

    नाईकांनी कागदपत्रे एसीबीकडे द्यायला पाहिजे होती

    पुरावे असल्यानंच यंत्रणा चौकशी करतात

    नितेश राणे यांची घणाघाती टीका

  • 18 Oct 2022 03:13 PM (IST)

    उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही

    Marathi News LIVE Update

    उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही

    नितेश राणे यांची घणाघाती टीका

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना पाहुनच आईस्क्रिमचा कोन

    अशी निशाणी निवडणूक आयोगाने दिली

    थेट हल्ला करण्याची ठाकरेंमध्ये हिंमत नाही

    शिक्षकांचा मुलगा वात्रट निघाला

    ठाकरे मातोश्रीमध्ये बसून फक्त मज्जा बघतात

    नितेश राणेंची ठाकरेंविरोधात चौफेर टीका

  • 18 Oct 2022 03:06 PM (IST)

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच पगार

    Marathi News LIVE Update

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार वेतन

    पगार दिवाळीआधी करण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आदेश

    बोनस तर बोनस दिवाळीपूर्वीच वेतनही

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच पगार

  • 18 Oct 2022 03:02 PM (IST)

    T20 World Cup 2022: अरेरे, लास्ट ओव्हरमध्ये श्रीलंकेला दणका देणाऱ्या नामीबियाच्या हातून निसटला विजय

    122 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही नामीबियाने विरोधी टीमला घाम फोडला.... वाचा सविस्तर 

  • 18 Oct 2022 03:00 PM (IST)

    भारत जोडो यात्रेत तीन मोठे नेते एकाच मंचावर

    Marathi News LIVE Update

    राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार एकाच मंचावर

    भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं तिन्ही नेते एकाच मंचावर येणार

    ठाकरेंनी भारत जोडो यात्रेचं निमंत्रण स्वीकारलं

    भारत जोडो यात्रेत तीन मोठे नेते एकाच मंचावर दिसणार

  • 18 Oct 2022 02:51 PM (IST)

    स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं वाटोळं केले

    Marathi News LIVE Update

    स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं वाटोळं केले

    अजित पवार यांचा भाजपवर प्रहार

    शहरातील उड्डाणपूल का पाडावे लागेलत?

    दुर्घटनांना जबाबदार कोण?

    अजित पवारांची भाजपवर चौफेर टीका

  • 18 Oct 2022 02:12 PM (IST)

    बुलढाण्यातील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल

    Marathi News LIVE Update

    बुलढाण्यातील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल

    लवकरच महाराष्ट्र दौरा काढणार, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

    बुलढाण्यातील कार्यकर्त्यांसोबत ठाकरे यांची चर्चा

    भाजपचे काही कार्यकर्ते ठाकरे गटात करणार प्रवेश

  • 18 Oct 2022 02:04 PM (IST)

    IND vs AUS मॅचमध्ये चहलच्या बॉलिंगवर थोडक्यात वाचला ऑस्ट्रेलियन बॅट्समनचा डोळा

    T20 World Cup 2022 आधी वॉर्मअप मॅचमध्ये स्विच हिटचा फटका ग्लेन मॅक्सवेलच्या अंगाशी आला असता...हा VIDEO

  • 18 Oct 2022 02:04 PM (IST)

    मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद

    मुंबई विमानतळ आज सहा तासासाठी बंद ठेवण्यात आले आहे

    धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी विमानसेवा बंद आहे

    सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानसेवा बंद असेल

    या कामामुळे शेकडो विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय.

  • 18 Oct 2022 01:54 PM (IST)

    सणांच्या तोंडावर ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांमध्ये मोठी वाढ

    पुणे-नागपूर तिकिटांचे दर दुप्पट

    ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी जोरात

    तिकिटांच्या दरावर अंकुश कोणाचा?

  • 18 Oct 2022 01:48 PM (IST)

    अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची पत्रकार परिषद

    पूरग्रस्तांना हवी तशी मदत मिळत नसल्याचा सरकारवर आरोप

    तातडीने मदत देण्याची मागणी

    अन्न धान्याचा पुरवठा तातडीने  करण्याची मागणी

  • 18 Oct 2022 01:18 PM (IST)

    IND vs PAK: 'या' चार कारणांमुळे टीम इंडियाकडून होईल पाकिस्तानचा पराभव, वॉर्मअप मॅचमध्ये पाकची पोलखोल

    T20 World cup 2022 मध्ये पाकिस्तानच्या 'या' चार कमकुवत बाजू आहेत. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानवर विजय मिळवू शकते. वाचा सविस्तर....

  • 18 Oct 2022 01:12 PM (IST)

    साताऱ्यात पुराच्या पाण्यात बापलेकीसह अर्टिंगा कार बुडाली

    साताऱ्यात पुराच्या पाण्यात बापलेकीसह अर्टिंगा कार बुडाली

    साताऱ्याच्या सोमंथळीदी हृदय हेलावणारी घटना, दोघांचा मृत्यू

    कारमध्ये पाणी येऊन वडील आणि मुलगी आतच अडकले

    छगन मदने आणि प्रांजल मदने अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे

    सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान घडली दुर्दैवी घटना

  • 18 Oct 2022 01:01 PM (IST)

    मातोश्रीबाहेर बुलडाण्यातील शिवसैनिक आक्रमक

    मातोश्रीबाहेर बुलडाण्यातील शिवसैनिक आक्रमक

    शिवसैनिकांकडून शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी

    50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा

    बुलडाण्यातील शिवसैनिकांची आज मातोश्रीवर बैठक

  • 18 Oct 2022 12:59 PM (IST)

    पवार, फडणवीस, शिंदेंची उद्या डिनर डिप्लोमसी

    शरद पवार, फडणवीस, एकनाथ शिंदेंची उद्या डिनर डिप्लोमसी

    MCA निवडणुकीबाबत डिनर डिप्लोमसी

    सत्तांतरानंतर पहिल्यांदाच तिघे एकत्र येणार

    उद्या सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम येथील MCA लौंउज येथे डिनर डिप्लोमसीचे आयोजन

  • 18 Oct 2022 12:56 PM (IST)

    इयत्ता दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

    इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    उद्यापासून दहावीचे परीक्षा अर्ज भरायला होणार सुरुवात

    19 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरता येणार अर्ज

    तर बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे

    5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली वाढवून

    माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं परिपत्रक केलं प्रसिद्ध !

  • 18 Oct 2022 12:51 PM (IST)

    अजित पवारांकडून शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर टीका

    शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या दमदाटी

    अजितदादांकडून शेलक्या शब्दात समाचार

    'अशी असभ्य भाषा वापरणं योग्य नाही'

    'ही भाषा महाराष्ट्राची संस्कृती नाही'

  • 18 Oct 2022 12:42 PM (IST)

    शिखर बँक चौकशी प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

    शिखर बँक चौकशी प्रकरण

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया

    'चौकशीला सहकार्य करणार'

  • 18 Oct 2022 12:14 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

    फडणवीस वरीष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

    अंधेरी पोटनिवडणूक माघारी नंतर फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

    फडणवीस यांचा आज एक दिवसाचा दिल्ली दौरा

  • 18 Oct 2022 12:08 PM (IST)

    केदारनाथमध्ये मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना

    केदारनाथमध्ये मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना

    खासगी कंपनीचं हेलिकॉप्टर क्रॅश, 6 ठार

    एका गावात हेलिकॉप्टर कोसळलं

    सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

    एकूण 8 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती, 6 जण ठार

    केदारनाथपासून दोन किमीच्या अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं

    गरुरचट्टीमध्ये हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना

    हेलिकॉप्टर दुर्घनटेचं कारण अस्पष्ट

  • 18 Oct 2022 12:00 PM (IST)

    बुलडाण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात प्रवेश

    बुलडाण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात प्रवेश

    भाजपबरोबरच राष्ट्रवादी, वंचितचे कार्यकर्तेही करणार प्रवेश

    मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश

    शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

  • 18 Oct 2022 11:34 AM (IST)

    सांगलीत आईची आपल्या दोन कोवळ्या मुलांसह आत्महत्या

    सांगलीत आईची आपल्या दोन कोवळ्या मुलांसह आत्महत्या

    विहिरीत उडी घेऊन आईनं मुलांसह जीव दिल्यानं खळबळ

    सांगलीतल्या जत तालुक्यातील सिंदूर येथील धक्कादायक घटना

    9 महिन्याच्या मुलासह 2 वर्षांच्या मुलीसोबत आईची विहिरीत उडी

  • 18 Oct 2022 11:34 AM (IST)

    IND vs NZ Warmup Match: ऑस्ट्रेलियाला नमवलं, आता न्यूझीलंडशी सामना, टीम इंडिया मॅचविनरला देणार विश्रांती

    IND vs NZ Warmup Match: न्यूझीलंड विरुद्ध कशी असेल टीम इंडियाची Playing 11. वाचा सविस्तर....

  • 18 Oct 2022 11:32 AM (IST)

    मराठा समन्वयक रमेश केरे पाटील यांचं प्रकरण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे

    रमेश केरे पाटलांच्या कुटुंबियांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

    घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची केली मागणी

    जे जे रुग्णालयात पोलीस रमेश केरेंचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती

  • 18 Oct 2022 10:43 AM (IST)

    यवतमाळ : गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

    अतिवृष्टी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

    यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील माळेगाव येथील घटना

    प्रेम धनु पवार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव

    बँक ऑफ महाराष्ट्र व खाजगी बँकेचे 2 लाखाचं होतं शेतकऱ्यावर कर्ज

  • 18 Oct 2022 10:19 AM (IST)

    पुणे नाशिक महामार्गवरील वाहतूक ठप्प

    चाकण ते आळंदी फाटा 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा

    महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक बंद

    एकेरी वाहतूक सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी

  • 18 Oct 2022 09:32 AM (IST)

    भांडुपमधील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात दुर्गा चायनीज सेंटर हॉटेलला भीषण आग

    अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

    व्हिडिओमध्ये या आगीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे

    शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती

    सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान

  • 18 Oct 2022 09:30 AM (IST)

    आमदार संजय शिरसाट एअर एम्ब्युलन्सने मुंबई दाखल

    आमदार संजय शिरसाट एअर एम्ब्युलन्सने मुंबई दाखल

    हार्टअटॅक आणल्यामुळे औरंगाबादेतून मुंबईत आणलं

    औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट उपचारासाठी मुंबईत

    तातडीने औरंगाबादहून मुंबईत आणलं गेलं

    संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात होणार पुढील उपचार

  • 18 Oct 2022 09:29 AM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला

    जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला

    शोपिया जिल्ह्यामध्ये ग्रेनेड हल्ला, उत्तर प्रदेशचे 2 रहिवासी ठार

    शनिवारी झालेल्या काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर पुन्हा खळबळ

    जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात अतिरेकी कारवायांची पुन्हा दहशत

  • 18 Oct 2022 09:16 AM (IST)

    लांडग्यांच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार, 4 शेळ्या जखमी

    लांडग्यांच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार, 4 शेळ्या जखमी

    लाखंदूर तालूक्यातील मांदेड येथील घटना

    पशुपालकाचे 60 हजार रुपयांचे नुकसान

  • 18 Oct 2022 09:07 AM (IST)

    पोलिसांना दिवाळी बोनस देण्याची मागणी

    मनसे नेते मनोज चव्हाणांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

    पोलिसांना दिवाळी बोनस देण्याची पत्रातून मागणी

    'सणासुदीच्या काळात पोलिसांचं आर्थिक समाधान व्हावं'

  • 18 Oct 2022 08:53 AM (IST)

    किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या पीएचडीची चौकशी करा

    युवा सेनेची राज्यपालांकडे भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या पीएचडीच्या चौकशीची मागणी

    राज्यपालांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

    युवा सेनेने काल मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु यांना पत्र लिहून सोमय्या पिता-पुत्राच्या मुंबई विद्यापीठाने दिलेल्या Phd ची चौकशी करण्याची मागणी केली होती

    सामान्यतः पीएचडी पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे इतका कालावधी लागत असताना सोमय्या पिता पुत्रांना 14 महिन्यांतच ती कशी मिळाली? युवा सेनेचा मुद्दा

    तसंच सोमय्या पिता पुत्राच्या पीएचडीशी संबंधित कागदपत्रे विद्यापिठाकडे उपलब्ध का नाहीत?, युवा सेनेचा सवाल

  • 18 Oct 2022 08:35 AM (IST)

    सिल्लोडमध्ये गुलाबराव पाटील आणि रावसाहेब दानवेंमध्ये टोलेबाजी

    सिल्लोडमध्ये गुलाबराव पाटील आणि रावसाहेब दानवेंमध्ये टोलेबाजी

    अडीच वर्षांपूर्वी आमचं लव्ह मॅरिज तुटलं - गुलाबराव पाटील

    आपलं लव्ह नाही तर अरेंज मॅरिज होतं, रावसाहेब दानवेंचा टोला

    लव्ह मॅरेज तर महाविकास आघाडीबरोबर केलं होतं - दानवे

  • 18 Oct 2022 08:18 AM (IST)

    आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा धक्का

    आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा धक्का

    संजय शिरसाठ औरंगाबादहुन उपचारासाठी मुंबईला रवाना

    एअर अंबुलन्स ने संजय शिरसाठ मुंबईला रवाना

    काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात सुरू होते उपचार

    आज सकाळी तातडीने उपचारासाठी मुंबईला रवाना

  • 18 Oct 2022 08:04 AM (IST)

    पुणे स्टेशन परिसरात स्थिती पुन्हा पूर्ववत

    पुणे स्टेशन परिसरात स्थिती पुन्हा पूर्ववत

    रात्री झालेल्या पावसामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी

    रेल्वे तिकीट घराजवळ साचलेल्या पाण्याचा अखेर निचरा

    पुण्यातील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत

  • 18 Oct 2022 08:01 AM (IST)

    शिवभोजन थाळीचे 3न महिन्यांचे अनुदान मिळाले नाही

    शिवभोजन थाळीचे तीन महिन्यांचे अनुदान मिळाले नाही

    शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्या चालकांच्या अडचणी वाढल्या

    जुलै महिन्यापासूनची अनुदानाची रक्कम प्रलंबित

  • 18 Oct 2022 07:47 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर

    आज दुपारी 1 वाजता फडणवीस दिल्लीत दाखल होणार

    अंधेरी पोटनिवडणुकीतील माघारीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा

    दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

    राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा?

  • 18 Oct 2022 07:36 AM (IST)

    गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट

    गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट

    म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपये वाढ

    गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ

    म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ

    शुक्रवारपासून होणार नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी

  • 18 Oct 2022 07:36 AM (IST)

    पुण्यात रात्री अडीच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस

    पुण्यात रात्री अडीच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस

    पहाटेपासून पावसाची विश्रांती, मात्र अनेक भागात पाणी साचलेलंच

    पुणे-सोलापूर हायवेवर पाणी साचल्यानं वाहनांच्या रांगा

    पुण्यातील रस्त्यांना रात्री आलं नद्यांचं स्वरूप

    प्रसिद्ध दगडूशेठ मंदिर आणि पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं

    कोंढवा, हडपसर, येवलेवाडी भागात रस्ते जलमय

    पहाटेपासून पाणी ओसरण्यास सुरूवात, पावसाची विश्रांती

Published On - Oct 18,2022 7:34 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.