IND vs PAK: ‘या’ चार कारणांमुळे टीम इंडियाकडून होईल पाकिस्तानचा पराभव, वॉर्मअप मॅचमध्ये पाकची पोलखोल

T20 World cup 2022 मध्ये पाकिस्तानच्या 'या' चार कमकुवत बाजू आहेत. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानवर विजय मिळवू शकते

IND vs PAK: 'या' चार कारणांमुळे टीम इंडियाकडून होईल पाकिस्तानचा पराभव,  वॉर्मअप मॅचमध्ये पाकची पोलखोल
pakistan teamImage Credit source: pcb
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 1:14 PM

मेलबर्न: T20 World Cup 2022 मध्ये सुपर 12 राऊंडचे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. 23 ऑक्टोबरला या टुर्नामेंटमधील सर्वात मोठा सामना होणार आहे. कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची प्रतिक्षा आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील या सामन्यासाठी दोन्ही टीम्सची जोरदार प्रॅक्टिस सुरु आहे. वॉर्मअप मॅचमध्ये (Warmup Match) पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यांच्या तयारीची पोलखोल झाली आहे. दुसऱ्याबाजूला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला नमवून आपली ताकत दाखवून दिली.

पाकिस्तानची टीम वॉर्मअप मॅच ज्या पद्धतीने खेळली, त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध त्यांचं जिंकण कठीण दिसतय. पाकिस्तानचे चार कच्चे दुवे समोर आले आहेत.

पाकिस्तानचा मिडल ऑर्डर फ्लॉप

पाकिस्तानची मिडल ऑर्डर हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आशिया कपपासूनच पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरने खराब प्रदर्शन केलय. आता टी 20 वर्ल्ड कप सुरु झालाय. पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरच्या प्रदर्शनात सुधारणा झालेली नाही. खुशदिल शाह, इफ्तिखार अहमदची कामगिरी खूपच वाईट आहे. त्यामुळे पाकिस्तानी टीमच नुकसान होतय.

पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत

पाकिस्तानची गोलंदाजी त्यांची ताकत समजली जात होती. पण आता त्यामध्येही अडचणी दिसत आहेत. शाहीन आफ्रिदीच्या समावेशामुळे पाकिस्तानची ताकत नक्कीच वाढली आहे. पण त्यांचे दुसरे गोलंदाज खराब कामगिरी करत आहेत. मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी, नसीम शाह यांचा इकॉनमी रेट खूपच खराब आहे. वॉर्मअप मॅचमध्ये पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजची जोरदार धुलाई झाली होती. शादाब खानचा गोलंदाजी फॉर्म चिंतेचा विषय आहे.

पाकिस्तानची खराब फिल्डिंग

मैदानावर पाकिस्तानी फिल्डर्स खराब कामगिरी करतायत. वॉर्मअप मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी दोन सोपे झेल सोडले. हॅरिस रौफ सोपी रनआऊटची संधी गमावली. टी 20 वर्ल्ड कपमध्ये खराब फिल्डिंग कुठल्याही टीमसाठी पराभवाच कारण बनू शकते.

पाकिस्तानी ओपनर्सचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय

पाकिस्तानी ओपनर्सचा स्ट्राइक रेट हा चिंतेचा विषय आहे. बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान धावा बनवतायत. पण त्यांचा स्ट्राइक रेट एक मुद्दा आहे. पाकिस्तानी टीमने 170 धावांचा पल्ला गाठणं ही सुद्धा मोठी बाब आहे. भारताविरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तानच्या टीमला आपल्या या समस्यांवर काम कराव लागेल.

Non Stop LIVE Update
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.