Eknath Shinde : आशिष जैस्वाल 3 आमदारांसह गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं

| Updated on: Jun 23, 2022 | 9:51 AM

आशिष जैस्वाल हे देखील गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.

Eknath Shinde : आशिष जैस्वाल 3 आमदारांसह गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं
Image Credit source: tv9
Follow us on

गुवाहाटी : आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) हे देखील गुवाहाटीमध्ये दाखल होणार आहेत. तीन आमदारांसह ते गुवाहाटीमध्ये पोहोचणार आहे. दहा वाजताच्या होणाऱ्या बैठकीतही ते असतील, अशी माहिती समोर आली आहे. आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. कालपासून आशिष जैस्वाल हे नॉट रिचेबल होते. अखेर ते गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होणार आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकरही शिंदे गटात सामील झाले आहेत. आशिष जेस्वाल यांना मिळून एकूण चार आमदार गुवाहाटीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं शिवसेनेसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना (Shivsena) आहे, असा दावा आता एकनाथ शिंदे करण्याची शक्यता आहे. चार आमदार वाढल्यानं आता एकनाथ शिंदे यांना मिळणारा शिवसेना आमदारांचा पाठिंबाही वाढलाय.

कोण कोण आलं?

आशिष जैस्वाल यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर या सर्व आमदारांसह गुवाहाटी इथं पोहोचलेले आहेत. सकाळी साडे नऊ वाजता ते गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व आमदार गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष जैस्वाल गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. काँग्रेसने नेते टक्केमारी मागत असल्याचा कारणाचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आरोपांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता आशिष जैस्वाल हे गुवाहाटीत दाखल झालेत. शिवाय आपल्यासह आणखी तिघा आमदारांनाही आणलंय.

हे सुद्धा वाचा

दोन तृतीआंश आमदारांची शिंदेंना गरज..

माझ्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीआंश शिवसेना आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. याचाच अर्थ 37 आमदारांची गरज एकनाथ शिंदे यांना आहे. तसं झालं तर शिवसेनेवरच एकनाथ शिंदे दावा ठोकू शकतात. यामुळे उद्धव ठाकरेंसमोर नवा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच्या आमदारांना विश्वासात घेत स्वतःला गटनेता असल्याचं म्हटलंय, तर प्रतोद म्हणून भरतशेट गोगावाले यांची नियुक्तीही केलीय.