सचिन वाझे काळा का गोरा हे माहिती नाही, फडणवीस आक्रमक, वाझे बिजे वाजत गेले, शेलारांचाही हल्लाबोल

| Updated on: Mar 05, 2021 | 7:04 PM

सचिन वाझे काळा का गोरा हे माहिती नाही, असं म्हणत फडणवीस आक्रमक झाले तर वाझे बिजे वाजत गेले, वाझेची भीती कुणाला दाखवता, अशा शब्दात आशिष शेलार यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली.

सचिन वाझे काळा का गोरा हे माहिती नाही, फडणवीस आक्रमक, वाझे बिजे वाजत गेले, शेलारांचाही हल्लाबोल
Devendra Fadanvis, Ashish Shelar And Anil Deshmukh
Follow us on

मुंबई :  वाझे बिजे वाजत गेले, सचिन वाझेची (Sachin Vaze) भीती आम्हाला दाखवू नका, आम्ही त्यांना घाबरत नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं. तर यावेळी देवेंद्र फडणवीसही (Devendra fadanvis) चांगलेच आक्रमक झाले होते. सचिन वाझे काळा का गोरा हे माहिती नाही, त्याचं आम्हाला काय सांगता, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह मिळाल्यानंतर विधानसभेत याचविषयावर चर्चा सुरु आहे. याचवेळी गृहमंत्र्यांच्या निवेदनावर आशिष शेलार यांनी जोरदार आक्षेप नोंदवत प्रत्युत्तर दिलं. (Ashish Shelar And Devendra fadanvis Attacked Anil Deshmukh Over police Officer Sachin Vaze)

तुमच्या अर्णवला आतमध्ये टाकलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर जळताय काय?, असं सभागृहात याप्रकरणावर निवेदन करताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. त्यावर सभागृहात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्र्यांच्या निवेदनावर आक्षेप नोंदवला.

आशिष शेलार काय म्हणाले…?

तुम्ही त्या वाझेला आमच्या अंगावर टाकू नका. तो वाझे बिझे गेला वाजत. या प्रकरणाची निक्ष:पणे चौकशी झाली पाहिजे. जर काळं बेरं नाही तर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे का देत नाही? तुम्ही स्वत: या प्रकरणात म्हटलं पाहिजे की हे प्रकरण आम्ही एनआयकडे देतो म्हणून, असा आक्रमक पवित्रा शेलार यांनी घेतला.   गृहमंत्र्यांच्या उत्तरात विसंगती आहे. वाझेचं नाव आलं की मुंबई पोलिसांचं नाव गृहमंत्र्यांनी जोडलं, असा आरोप शेलार यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले…?

गृहमंत्र्यांनी सचिन वाझे आणि अर्णवची अटक यावरुन जे निवेदन दिलं ते न पटणारं आहे. आम्हाला त्या वाझेचं देणंघेणं नाही. गृहमंत्र्यांनी वाझे यांचा उल्लेख कााढला पाहिजे. त्या वाझेची भीती आम्हाला दाखवू नका, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…?

मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कुणाला वाचवत आहात?, असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाहीत. तसेच क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वात आधी गोस्वामी पोहोचले कसे? वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास कस? असा सवाल फडणवीस यांनी केला.

कोण सचिन वाझे? काळा की गोरा आम्हाला माहीत नाही. त्याने काय केलं किती एन्काऊंटर केले त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सांगत याप्रकरणाचे माझ्याकडे पुरावे आहेत. सीडीआर आहे. स्टेटमेंट आहे. मी हवेत बोलत नाही. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचे आरोप गंभीरपणे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं निवेदन

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे आणि मुंबई पोलीस सक्षम आहे. एएनआयकडे तपास देण्याची गरजच नाही, असं सांगताना अर्णवला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचा त्याच्यावर राग आहे का?, असा सवाल त्यांनी विरोधी पक्षाला केला.

(Ashish Shelar And Devendra fadanvis Attacked Anil Deshmukh Over police Officer Sachin Vaze)

हे ही वाचा :

Mansukh Hiren death case : फडणवीस म्हणाले, कुणाला वाचवताय? गृहमंत्री म्हणाले, अर्णवला आत टाकला म्हणून वाझेंवर राग का?

Who is Sachin Vaze : अर्णबला घरातून उचलणारे ते आता अंबानी स्फोटकप्रकरणात चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे कोण?