स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार, शेलारांचं टीकास्त्र

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी सुरु केलेलं सोशल मीडिया वॉर सुरुच आहे. शेलार यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर देत, शेलारांवर निशाणा साधला होता. आज आशिष शेलार यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला. स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे, धनंजयराव […]

स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार, शेलारांचं टीकास्त्र
Follow us on

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी सुरु केलेलं सोशल मीडिया वॉर सुरुच आहे. शेलार यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर देत, शेलारांवर निशाणा साधला होता. आज आशिष शेलार यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला. स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे, धनंजयराव चिडले? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांचं ट्विट

रक्तात राष्ट्रवाद असलेल्या पक्षाला सोडून फक्त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले. स्वतःच्या काका, ताईला सोडून बारामतीच्या काका, ताईंचा प्रचार करणारे, धनंजयराव चिडले? लेकीन अबे ओ सांबा..आपके पिछे कितने गब्बर छूपे हैं.. ?वो तो देखलो !..लढ धन्नो..!! असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं.

आशिष शेलार यांनी कालही ट्विटरवर कविता करत राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. कुसुमाग्रजांच्या ‘फक्त लढ म्हणा’ या कवितेत शब्द बदलून, आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा दोन्ही नेत्यांवर आशिष शेलारांनी ट्वीटरवरुन टीका केली आहे.

सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं होतं.

आशिष शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ट्विटरवरुनच उत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जायना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले” असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांनी राज ठाकरेंना डिवचलं!