“ह्यांचे एकच काम, याला फोडा त्याला जोडा,” अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका, काँग्रेसकडून देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी

| Updated on: Jun 13, 2021 | 7:59 PM

ह्यांचा एकच कार्यक्रम आहे, ह्याला फोडा त्याला जोडा. ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखे यांचे चालले आहे. त्यामुळे आता एकच काम करा यांना मारा हातोडा आणि गावाबाहेर काढा," अशी घणाघाती टीका सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली.

ह्यांचे एकच काम, याला फोडा त्याला जोडा, अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका, काँग्रेसकडून देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी
ASHOK CHAVAN
Follow us on

नांदेड : “ह्यांचा एकच कार्यक्रम आहे, ह्याला फोडा त्याला जोडा. ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखे यांचे चालले आहे. त्यामुळे आता एकच काम करा यांना मारा हातोडा आणि गावाबाहेर काढा,” अशी घणाघाती टीका सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपवर (BJP) केली. देगलूर तालुक्यातील बिलोली येथे आयोजित केलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. (Ashok Chavan criticizes BJP over its politics and election in Nanded Deglur)

अशोक चव्हाण काय म्हणाले ?

बिलोली येथे काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपवर धारदार शब्दांत टीका केली. यावेळी बोलताना ते भाजपला उद्देशून “यांचा एकच कार्यक्रम आहे. यांना फोडा, त्याला जोडा. ग्रामपंचायत निवडणुकीसारखं यांचं सुरु आहे,” असे म्हणाले. तसेच पुढे बोलताना “त्यांना फक्त एव्हढ सांगा आमचे चांगले दिवस यायचे आहेत. कृपया आमच्या भागात येऊन नास करायचं काम करु नका,” असे आवाहनही त्यांनी बिलोली येथील जनता आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केले. विरोधकांना तुम्ही असे सांगितले तर त्यांची या भागात फिरायची हिम्मतसुद्दा होणार नाही, अशी पुष्टीही चव्हाण यांनी जोडली.

काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची तयारी

काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्याचीच प्रचिती आज घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात आली. यावेळी अशोक चव्हाण यांनी आगामी पोटनिवडणूक समोर ठेवून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?

ओबीसींच्या बैठकांवर बैठका, पुण्यानंतर पुन्हा लोणावळ्यात 26 आणि 27 जूनला शिबीर, काय ठरलं पुण्यात?

“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी”

(Ashok Chavan criticizes BJP over its politics and election in Nanded Deglur)