ओबीसींच्या बैठकांवर बैठका, पुण्यानंतर पुन्हा लोणावळ्यात 26 आणि 27 जूनला शिबीर, काय ठरलं पुण्यात?

ओबीसींच्या आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

ओबीसींच्या बैठकांवर बैठका, पुण्यानंतर पुन्हा लोणावळ्यात 26 आणि 27 जूनला शिबीर, काय ठरलं पुण्यात?
विजय वडेट्टीवार, काँग्रेस

पुणे : ओबीसींच्या आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, येत्या 26 व 27 जूनला लोणावळ्याला 250 लोकांचे शिबीर घेण्यात येईल, हे शिबीर तीन सत्रात चर्चा होईल आणि पुढील वाटचाल ठरवली जाईल. (Meetings in Lonavla after Pune for OBC reservation says Vijay Wadettiwar)

वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही ओबीसी आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन दिले आहे. आरक्षणाचा हा विषय केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण देशातील आरक्षणाचा विषय आहे. दरम्यान, वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, जातनिहाय जनगणना करायला हवी.

दरम्यान, वडेट्टीवारांनी यावेळी सर्व पक्षातील नेत्यांना आरक्षणासाठीच्या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. तसेच ओबीसी आरक्षण राज्याच्या अखत्यारित नाही, त्यामुळे कोणीही राजकारण करू नये.

लोणावळ्यातील शिबिरात पुढील वाटचाल ठरणार?

लोणावळ्यात होणाऱ्या शिबिराविषयी वडेट्टीवार म्हणाले की, तिथं सर्व लोक पक्ष सोडून उपस्थित राहतील. तिथेच ओबीसींची पुढची वाटचाल आणि दिशा ठरवली जाणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्र येतोय याचा अभिमान आहे. आम्ही कुठल्याही पक्षाच्या, समजाच्या आणि संघटनेच्या विरोधात नाही. ओबीसी चळवळीमध्ये जे लोक काम करत आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावे.

स्वतंत्र आयोगाचा विचार

जातनिहाय डेटाविषयी विचारल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले की, देशभर जातनिहाय जनगणनेचा डेटा जमा झाला आहे. पण हा इम्पेरियल डेटा कलेक्ट करण्यासाठी चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ. स्वतंत्र आयोग करायचा का? याबाबत विचार करू. 50 टक्क्यांहून अधिक SC, ST चं आरक्षण झाल्यावर उर्वरित आरक्षण हे ओबीसीलाच मिळालं पाहिजे. इम्पेरियल डेटा आला तरी 50 टक्क्यांच्या वर जाणार नाही.

मराठा आरक्षणासाठी केंद्राने घटनादुरुस्ती करावी

मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण वाढवावे लागेल. त्यासाठी केंद्राने घटनादुरुस्ती करावी. मी मंत्री असलो तरी माझी मागणी आहे की, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ही जनगणना झाली तर ओबीसींचे प्रश्न सुटतील.

संबंधित बातम्या

जनगणनेसाठी संसदेत आवाज उठवूनही आकडेवारी न आल्यानेच ओबीसींचं नुकसान; भुजबळांचा आरोप

Ashok Chavan | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रानं सकारात्मक भूमिका घ्यावी : अशोक चव्हाण

OBC reservation : आम्ही अडचणीत, मदत करा, छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

(Meetings in Lonavla after Pune for OBC reservation says Vijay Wadettiwar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI