नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?

मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं,अशी इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली. (Nana Patole)

नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?
नाना पटोले


अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं,अशी इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली. नाना पटोले चांगला व्यक्ती असल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलंय. गुरूवारी रात्री पारस फाट्यावरील ‘हॉटेल मराठा’ येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नाना पटोले यांनी त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम निष्ठेने करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन राजकीय पडसाद उमटण्या सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्याकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. (Congress State President Nana Patole statement on Chief Minister NCP Shivsena reaction)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पटोले यांची स्वबळावरुन खिल्ली

नाना पटोले यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी टीकास्त्र सोडलं आहे. नाना पटोले यांनी विधानसभा निवडणूक स्बळाची केली जातेय. मात्र, कॉमन मिनीममच्या अजेंड्यावर पक्ष एकत्र आलो आहोत. नाना पटोले यांनी त्यांचा पक्ष एक नंबर करावा, मात्र त्यांनी राज्यातील सत्तेत आपण भागीदार आहोत, हे विसरु नये, असं सुरज चव्हाण म्हणाले आहेत.

भाजपची प्रतिक्रिया काय?

कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे विधान त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हे स्पष्ट दर्शवते की त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास नाही, असं राम कदम म्हणाले आहेत. मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कॉंग्रेसला अपमानित करत आहेत तेही दुःख नाना पटोले यांच्या विधानातून स्पष्ट होते, असं राम कदम म्हणाले आहेत.

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया काय?

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना नाना पटोले यांनी जाहीर केलेल्या इच्छेविषयी पत्रकारांनी विचारले. विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत प्रश्नच नाही, असं उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्रिपदामध्ये वाटाघाटी नाही, संजय राऊत यांची भूमिका

संजय राऊत हे सध्या खानदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच भाग म्हणून ते नाशकातही पक्षाच्या बैठका घेत आहेत. अशाच एका बैठकीनंतर दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात एका पत्रकारानं प्रश्न विचारला की, आघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावेळेस संबंधित पत्रकाराला करेक्ट करत राऊत म्हणाले की, ‘मी रोखठोकमध्ये सत्तेच्या फॉर्म्युल्याबद्दल लिहीलेलं नाही. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीसोबतही मुख्यमंत्रीपदावरुन सेनेचा ‘शब्द’ देण्याचा वाद? राऊतांचं नाशकातही रोखठोक ‘5 वर्ष’

राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झालेय; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

(Congress State President Nana Patole statement on Chief Minister NCP Shivsena reaction)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI