Imtiaz Jalil vehicle Attack : इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला, छत्रपती संभाजीनगरात मोठा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज

मोठी बातमी समोर येत आहे, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वहनावर हल्ला करण्यात आला आहे.

Imtiaz Jalil vehicle Attack : इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला, छत्रपती संभाजीनगरात मोठा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज
Imtiaz Jalil vehicle Attack
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 07, 2026 | 3:23 PM

मोठी बातमी समोर येत आहे, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वहनावर हल्ला करण्यात आला आहे. जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली आहे, त्यांच्या वाहानावर धारदार शस्त्रानं वार करण्याचा प्रयत्न झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे, महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. नव्या लोकांना संधी देण्यात आली, असा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

मोठा गोंधळ 

दरम्यान एआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं, नव्यांना संधी देण्यात आली, तसेच स्थानिक लोकांना देखील डावलण्यात आलं, असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे, त्यानंतर जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. नाराज कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. यामुळे वातावरण चांगलंच तापलं. या हल्ल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी एमआयएममधील गटबाजी समोर आली आहे.

दरम्यान जलील यांच्या वहानावरील हल्ल्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांच्या वहानावर हल्ला झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची सभा होणार आहे. या सभेपूर्वीच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी जलील यांना सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जलील यांच्या वहानावर हल्ला केला. दरम्यान या घटनेमुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.