औरंगाबाद महापालिकेत युतीचा काडीमोड, भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा

औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे.

औरंगाबाद महापालिकेत युतीचा काडीमोड, भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी झालेल्या वादामुळे भाजप-शिवसेना युती तुटली. या हादऱ्याची झळ मुंबईनंतर औरंगाबादलाही पोहचली आहे. युतीचा गड समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा (Aurangabad Deputy Mayor Resign) दिला.

महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्चीजवळ न जाता नगरसेवकांमध्ये जाणं पसंत केलं. त्यानंतर औताडे यांनी राजीनाम्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे.

शिवसेना नेते मनोहर जोशी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना युती तुटल्यानंतरही भाजप-शिवसेना भविष्यात एकत्र येण्याची आशा वाटते. मात्र तूर्तास राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांतील लढती भाजप विरुद्ध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी अशी होण्याची चिन्हं आहेत.

महाविकास आघाडीचा रथ रोखण्यासाठी गणेश नाईकांची समर्थक नगरसेवकांसह खलबतं

भाजप-शिवसेना युतीची सत्ता गेली 30 वर्ष औरंगाबाद महापालिकेवर आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवत होते. मागील अनेक वर्षे महापालिकेच्या सभागृहात नेहमी एकत्र बसणारे युतीचे नगरसेवक सर्वसाधरण सभेतही वेगवेगळे बसल्याचं चित्र होतं.

‘तुम्ही एकत्र निवडणूक लढवली, मात्र आता तुम्ही सत्तेत एकत्र नाही, मग तुम्ही औरंगाबाद महापालिकेत एकत्र कसे? हा प्रश्न आम्हाला जनता विचारत आहे. याचं उत्तर म्हणून मी माझ्या उपमहापौरपदाचा राजीनामा देत आहे’ असं स्पष्टीकरण औताडेंनी (Aurangabad Deputy Mayor Resign) दिलं.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना – 29
एमआयएम – 25
भाजप – 22
काँग्रेस – 08
राष्ट्रवादी – 04
इतर – 24
एकूण – 112

(संदर्भ : विकीपीडिया)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *