अब्दुल सत्तारांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं, माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर, 9 तासांनी सत्तारांची प्रतिक्रिया

| Updated on: Jan 04, 2020 | 7:12 PM

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार अखेर जवळपास 9 तासांनी हॉटेलबाहेर येऊन त्यांनी माध्यमांकडे राजीनाम्याबाबतचं स्पष्टीकरण (Abdul Sattar resigns) दिलं

अब्दुल सत्तारांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं, माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर, 9 तासांनी सत्तारांची प्रतिक्रिया
Follow us on

औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार अखेर जवळपास 9 तासांनी हॉटेलबाहेर येऊन त्यांनी माध्यमांकडे राजीनाम्याबाबतचं स्पष्टीकरण (Abdul Sattar resigns) दिलं. अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं, शिवाय ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा, असं अब्दुल सत्तार (Abdul Sattar resigns) म्हणाले.

“मी पत्रकारांच्या एकेक प्रश्नाचे उत्तर देईन. मी मुख्यमंत्र्यांशी सर्व चर्चा करेन त्यानंतर यावर उत्तर देईन.  पण मी आज तुम्हाला उत्तर देणार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर उत्तर देईन. ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना जाऊन विचारा. माझा कंट्रोल ‘मातोश्री’वर आहे. मी आज मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे. मी राजीनामा दिला की नाही हे ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा”, असं अब्दुल सत्तार (Abdul Sattar resigns) म्हणाले.

“मी राजीनामा दिला हे ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितले त्यांना जाऊन विचारा. कुणी काही बोलेल, माझा सर्व कंट्रोल हा मातोश्रीवर आहे. मी तिथे जाऊन सर्व विषयावर चर्चा करणार आहे. चर्चा करुन तुमच्याशी बोलेन. माझी भूमिका मी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर जाऊन मांडेन, असं आमदार अब्दुल सत्तार यावेळी (Abdul Sattar resigns) म्हणाले.

“मला मानण्याचा प्रश्न नाही. मी सर्व प्रश्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करेन आणि तुम्हाला उत्तर देईन. आज माझी एकच विनंती आहे की कोणीही माझ्याबद्दल काय बोललं, काय नाही बोललं याची पूर्ण तंतोतंत माहिती उद्धव ठाकरेंकडे दिली जाईल. माझी काय भूमिका आहे हे मी त्यांच्यासमोर मांडेन. त्यानंतर तो जो निर्णय घेतील हा सर्वांना मान्य राहिलं किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. पण मला आज कोणत्याही या प्रश्नावर उत्तर द्यायचे नाही. मी वेळ आल्यानतंर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देईन. मी मुंबईला जाणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंशी चर्चा करेन आणि तुम्हाला सांगेन.” असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

राजीनामा दिल्याचं वृत्त

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त सकाळी आलं. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा (Abdul Sattar resigns as MOS) दिल्याचं सांगण्यात येत होतं.

मात्र शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं. मात्र अब्दुल सत्तार हे सकाळपासून औरंगाबादेतील हॉटेलमध्ये होते. त्यांनी स्वत: याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे दिवसभर अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्याच वृत्ताने राज्याचं राजकारण ढवळून निघालं. अखेर अब्दुल सत्तार हे 8 तास 45 मिनिटांनी हॉटेल बाहेर आले आणि त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते. सत्तारांसारखेच दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं (Abdul Sattar resigns) जातं.

खरं तर अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा शिवसेनेकडे आलेला नव्हता. सत्तार ज्या नेत्यांकडे राजीनामा दिला असं सांगत आहेत त्यांच्याकडे राजीनामा आलेला नाही, असं सांगितलं जात होतं.

अल्पसंख्याक समुहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपलं राजकीय वर्चस्व कायम (Abdul Sattar resigns)  राखलं.