दादा प्रेमळ, पण रागीट वाटतात, ते उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्रीच वाटतात : चंद्रकांत पाटील

| Updated on: Mar 09, 2020 | 6:53 PM

अजित पवार आणि कोथरुडचे भाजप आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. (Chandrakant Patil calles Ajit Pawar CM)

दादा प्रेमळ, पण रागीट वाटतात, ते उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्रीच वाटतात : चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : “अजितदादा डायनॅमिक लीडर आहेत. दादा तसे प्रेमळ आहेत, फक्त रागीट वाटतात. दादा तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज येत नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil calles Ajit Pawar CM) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.  सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हीएशन गॅलरीचा उद्घाटन (Balasaheb deoras aviation gallery) सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजित पवार आणि कोथरुडचे भाजप आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकाच मंचावर उपस्थित होते. (Chandrakant Patil calles Ajit Pawar CM)

यावेळी चंद्रकांत पाटलांनी विविध विकास कामांवर भाष्य करताना अजित पवारांकडे विमानतळ आणि हेलिकॉप्टरची मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्याला एक छोटं का होईना विमानतळ असलं पाहिजे. सगळे नियम पूर्ण करणारे एक हेलिपॅड प्रत्येक जिल्ह्यात असावं. अत्यावश्यक वेळेत हे गरजेचे आहे. अजित पवार या मागण्या पूर्ण करतील. ते डायनॅमिक लीडर आहेत.  तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात”

अजित पवार

राजकीय स्थित्यंतरे घडत असतात, जनतेला जे काम करायचे असते ते करते, पुणेकरांनी तो कौल दिला आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

जगामध्ये कोरोनाचं मोठं संकट आहे. पण खबरदारी घेतली पाहिजे.  तुम्ही बघितलं मी कुणाच्या हातात हात देत नव्हतो. केंद्र आणि राज्य सरकारने याची नोंद घेतली पाहिजे.  भिंवडीमध्ये काय प्रकार घडलाय, त्याची चौकशी करण्यास सांगितले आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जीवाशी खेळ केला जातोय, असं म्हणत अजित पवारांनी भिवंडीतील धुवून मास्क विक्रीच्या तयारीत असलेल्या टोळीला इशारा दिला.

केंद्र सरकार एयर इंडिया कंपनी कुणाला तरी देण्याच्या विचारात आहे. यंदाच्या बजेटमध्ये पुण्यात विमानतळ झालं पाहिजे तसा प्रयत्न केला आहे. धावपट्टी प्रत्येक जिल्ह्यात असली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

पंगत बसली आहे, आणि कुणाला किती वाढायचं ते आता माझ्या हातात आहे. केंद्र आणि राज्य आणि महापालिकेच्या कारभारात पारदर्शकपणा असला पाहिजे.  मी जोपर्यंत मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत मी कुठलंही राजकारण करणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.