बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, त्यामुळे संख्याबळ नसूनही भाजपचे भागवत कराड महापौर झाले, गडकरींचा भन्नाट किस्सा

| Updated on: Jul 30, 2021 | 10:57 AM

नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंतचा प्रवास, शिवसेना-भाजप युती, नारायण राणेंचं मंत्रिमंडळ असे विविध राजकीय किस्से सांगितले.

बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, त्यामुळे संख्याबळ नसूनही भाजपचे भागवत कराड महापौर झाले, गडकरींचा भन्नाट किस्सा
Nitin Gadkari_Bhagwat Karad_Balasaheb Thackeray
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) काल 29 जुलैला हा समारंभ पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंतचा प्रवास, शिवसेना-भाजप युती, नारायण राणेंचं मंत्रिमंडळ असे विविध राजकीय किस्से सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांचा किस्सा सांगितला. (How Bhagwat Karad Nitin Gadkari )

भागवत कराड हे औरंगाबादचे महापौर होते. संख्याबळ नसतानाही भागवत कराड महापौर कसे झाले, याचा किस्सा गडकरींनी सांगितला.

नितीन गडकरी म्हणाले, “डॉ. भागवत कराड हे संभाजीनगरमधील अतिशय उत्तम कार्यकर्ते. महानगरपालिकेचे महापौर होते. त्यांना महापौराच्यावेळी अडचण होती. शिवसेना आणि भाजपमध्ये टाय होती. त्यावेळी भाजपचा महापौर होणं शक्य नव्हतं. त्यावेळी हे सगळे आले आणि म्हणाले बाळासाहेबांकडे फक्त तुम्हीच जाल आणि बाळासाहेब तुमचं ऐकू शकतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यावेळी मी बाळासाहेबांना म्हणालो, भाजपला संधी द्या, कारण कराडसारखा चांगला माणूस महापौर होईल, अशी विनंती केली. त्यावेळी बाळासाहेबांनी आमची संख्या कमी असतानाही त्यावेळी परवानगी दिली आणि त्यांच्या आशिर्वादाने भागवत कराड महापौर झाले.

VIDEO : भागवत कराड महापौर कसे झाले होते? नितीन गडकरींनी किस्सा सांगितला!

भागवत कराड कोण आहेत?

-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक
-1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर
-2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर
-2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी

डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.

अपक्ष नगरसेवक म्हणून विजयी

डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. 1990 मध्ये ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Who is Bhagwat Karad)

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

26 मार्च रोजी 2020 रोजी राज्यसभेची निवडणूक झाली. त्यात कराड विजयी झाले. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. ही मतं कराड यांना मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे. (Who is Bhagwat Karad)

संबंधित बातम्या  

Bhagwat karad in cabinet: गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, नगरसेवक ते केंद्रीय मंत्रिपद, वाचा भागवत कराड कोण आहेत?