फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. | Nitesh Rane Uddhav Thackeray

फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
नितेश राणे, आमदार, भाजप
| Updated on: Mar 31, 2021 | 3:11 PM

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन (Balasaheb Thackeray Memorial )सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राज्यात सध्या मानापमान नाट्य रंगले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण नसल्यामुळे विरोधक राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य करत आहेत. (BJP MLA Nitesh Rane slams CM Uddhv Thackeray)

या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे हा मनाचा राजा माणूस होता. राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मनं खूप लहान झाली आहेत, अशी खोचक टिप्पणी नितेश राणे यांनी केली आहे.

भूमिपूजन सोहळ्याचे छापील आमंत्रण कोणालाच नाही; शिवसेनेचं स्पष्टीकरण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला कुणाला आमंत्रण आहे की नाही, हे मला माहिती नाही. आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार आहोत, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे कुणाला आमंत्रण आहे वा नाही हे माहीत नाही. पण हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. आम्ही देखील हा कार्यक्रम ऑनलाईनच बघणार आहोत. त्यामुळे कोण काय सांगते त्याला महत्त्व नाही. ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे, माझ्यासारखा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांनी घडला आहे. त्यामुळे कोण काय बोलतो त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असेही परब यांनी म्हटले.

हे स्मारक नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान

शिवसैनिकांसाठी शिवजयंती म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पुजाच आहे. त्यासोबतच आमचे दुसरे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं ही आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या या वास्तूमुळे त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या जनतेलाही कळणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक होऊ घातलं आहे. हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले.

संबंधित बातम्या:

Balasaheb Thackeray Memorial | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

भूमिपूजन सोहळ्याचे छापील आमंत्रण कोणालाही नाही, आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार : अनिल परब

(BJP MLA Nitesh Rane slams CM Uddhv Thackeray)