सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचा प्रस्ताव आला, तर विचार करु : बाळासाहेब थोरात

| Updated on: Oct 25, 2019 | 6:43 PM

सरकार स्थापनेसाठी जर शिवसेनेचा प्रस्ताव आता तर त्यावर विचार केला जाईल, असं थोरात यांनी सांगितलं (Balasaheb Thorat on Shivsena). तसेच, पुढे काय करायचं आहे याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, असंही ते म्हणाले.|

सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचा प्रस्ताव आला, तर विचार करु : बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली, निकालही लागले (Maharashtra Vidhansabha Results). यंदाचे निकाल हे काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद दाखवणारे ठरले. या निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या. दुसरीकडे, ‘अबकी बार 200 पार’ म्हणणाऱ्या भाजपला केवळ 105 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या (Maharashtra Vidhansabha Results). निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेसाठी जर शिवसेनेचा प्रस्ताव आता तर त्यावर विचार केला जाईल, असं थोरात यांनी सांगितलं (Balasaheb Thorat on Shivsena). तसेच, पुढे काय करायचं आहे याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, असंही ते म्हणाले.

सरकार स्थापनेसाठी सध्यातरी आम्हाला शिवसेनेकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही (Balasaheb Thorat on Shivsena). मात्र जर शिवसेनेचा प्रस्ताव आला, तर आम्ही विचार करु शकतो, असं थोरात म्हणाले. वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर यावेळी थोरातांनी भाजप सरकारवरही निशाणा साधला. भाजपने गेली पाच वर्ष शिवसेनेला कसाप्रकारे वागवलं, ते शिवसेनेला माहीत आहे. म्हणून आता त्यांनी हे ठरवायचं आहे, की पुढे काय करायचं, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

जनतेने आमहाला विरोधात बसण्याचा कौल दिला, तो आम्ही मान्य करतो

निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. तर 10 अपक्षही आमच्या संपर्कात आहेत, असं थोरातांनी या पत्रकार परिषदेत सागंतिलं. ही निवडणूक महत्वाची होती. आम्हाला जास्त जागा येतील अशी अपेक्षा होती, मात्र 44 जागाच आम्ही जिंकू शकलो. अखेर हा जनतेचा कौल आहे आणि तो आम्ही मान्य करतो. जनतेने
आमहाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, म्हणून आम्ही इतर विरोधी पक्षांसोबत काम करणार असल्याचंही थोरातांनी यावेळी स्पष्ट केलं.

तसेच बाळासाहेब थोरातांनी एक्झिट पोलवरही निशाणा साधला. जे अशोक चव्हाण एक लाख मताधिक्क्याने जिंकून आले, ते हरणार असल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे त्या सर्व एजन्सीनी माफी मागावी, या मताचा मी आहे. तसेच, प्रसार माध्यमांनी देखील काळजी घ्यायला हवी, असं थोरात म्हणाले.

आम्ही चांगल्या पध्दतीने निवडणुकीला सामोरे गेलो. आता आम्हाला शहरी भागात लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.