AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete: “तीन तारखेलाही घातपाताचा प्रयत्न झाला, 2 गाड्यांनी मेटेंचा पाठलाग केला, आताही तीच शक्यता”

याआधीही मेटेसाहेबांच्या घातपाताचा प्रयत्न झालाय. ...तर आताही घातपात झालेला असु शकतो, शिवसंग्रामच्या नेत्याची प्रतिक्रिया...

Vinayak Mete: तीन तारखेलाही घातपाताचा प्रयत्न झाला, 2 गाड्यांनी मेटेंचा पाठलाग केला, आताही तीच शक्यता
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 16, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं परवा म्हणजे 14 ऑगस्टला अपघाती निधन झालं. पण त्यांच्या गाडीसोबत घडलेली घटना हा अपघात आहे की घातपात आहे? अशी शंका उपस्थित केली जात आहे. अश्यात आता शिवसंग्रामच्या (Shivsangram) बीडच्या पदाधिकाऱ्यांनी नवा खुलासा केला आहे. याआधीही त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न करणयात आला होता, असं शिवसंग्रामचे नेते अण्णासाहेब वायकर यांनी सांगितलं. तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या आसपास दोन गाड्यांनी पाठलाग केला. आयशर गाडीने हा पाठलाग केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा ही गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं मी मेटेसाहेबांना सांगितलं. पण ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो वारंवार पाठलाग करत असेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आम्ही शांत बसलो. पण आता जो अपघात झाला त्यातही जर आयशर गाडी असेल आणि तीन तारखेला पाठलाग केलेलीच गाडी असेल, तर हा घातपातट आहे,आम्ही शांत बसणार नाही, असंही ते म्हणालेत.

अपघाती निधन

विनायक मेटे यांच्या 14 ऑगस्टला पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

तीन तारखेलाही घातपाताचा प्रयत्न

“तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या आसपास दोन गाड्यांनी पाठलाग केला. आयशर गाडीने हा पाठलाग केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा ही गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं मी मेटेसाहेबांना सांगितलं. पण ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो वारंवार पाठलाग करत असेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आम्ही शांत बसलो. पण आता जो अपघात झाला त्यातही जर आयशर गाडी असेल आणि तीन तारखेला पाठलाग केलेलीच गाडी असेल, तर हा घातपातट आहे,आम्ही शांत बसणार नाही”, असंही ते म्हणालेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?