AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला पाडण्यासाठी काहीजण… एकीकडे पालकमंत्रिपदाचा वाद, दुसरीकडे गोगावलेंचा खळबजनक आरोप!

पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत एका प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरल्या आहेत, असं बोललं जातंय. त्यामुळेच मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पालकमंत्रिपदाचा वाद नव्याने उफळला असतानाच गोगावले यांनी भर सभेत मोठे विधान केले.

मला पाडण्यासाठी काहीजण... एकीकडे पालकमंत्रिपदाचा वाद, दुसरीकडे गोगावलेंचा खळबजनक आरोप!
Bharat Gogawale
| Updated on: Aug 13, 2025 | 6:48 PM
Share

Bharat Gogawale : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही संपलेला नाहीय रायगड जिल्ह्याचं प्रकरण तर फारच चर्चेत आहे. रायगड जिल्ह्यासाठी स्वातंत्र्यदिनामित्तच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. त्यामुळेच पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत एका प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरल्या आहेत, असं बोललं जातंय. त्यामुळेच मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पालकमंत्रिपदाचा वाद नव्याने उफळला असतानाच गोगावले यांनी भर सभेत मोठे विधान केले. माझ्या पराभवसाठी महायुतीच्याच काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते, असा आरोप त्यांनी केलाय.

हा भरत गोगावले निवडून येऊ नये म्हणून…

रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात शिवसेनेकडून निर्धार मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात भरत गोगावले बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली. मी आज मंत्री झालो. हा भरत गोगावले निवडून येऊ नये म्हणून महायुतीच्या काही नेत्यांनीही देव पाण्यात ठेवले होते. मात्र जनतेच्या आशीर्वादानं मी 26 हजार 200 मतांनी निवडून आलो, असे गोगावले म्हणाले. आम्ही गोरगंरीबाचे शेठ आहोत. आम्ही शासनाला लुटणारे नाहीत, असंही ते म्हणाले.

 सुनील तटकरेंनी सांगितलं मी 10 कोटी…

पुढे आपल्या भाषणात गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत सुनिल तटकरे यांना थेट लक्ष्य केलं. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी कधीही कोणत्याही प्रकल्पाला आईचं नाव दिलेलं नाही. सुनील तटकरेंनी सांगितलं मी 10 कोटी देतो पण माझ्या आईचं नाव द्या, अशी टीका गोगावले यांनी केली. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी एका भाषणादरम्यान, हातात रुमाल घेत भरत गोगावले यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्याचाही समाचार गोगावले यांनी घेतला. काही लोकांनी आमच्या रूमालाची टिंगल केली. पण आम्ही शून्यातून इकडे आलेलो आहोत, असा हल्लाबोल गोगावले यांनी केला. दरम्यान आता भरत गोगावले यांना पाडण्यासाठी कोण प्रयत्न करत होतं? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा