कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही : आशिष शेलार

| Updated on: Feb 19, 2021 | 11:55 AM

कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (BJP Ashish Shelar Answer Sanjay Raut)

कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही : आशिष शेलार
Sanjay Raut Ashish Shelar
Follow us on

मुंबई : कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारचाही जोरदार समचार घेतला. (BJP Ashish Shelar Answer Sanjay Raut)

बाकी ठिकाणी गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?

शिवजन्मोत्सव हा दिवाळी सणासारखा एक मोठा उत्सव आहे. सरकारने कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घ्यायला हवीच मात्र शिवभक्तांचा उत्साह देखील लक्षात घ्यावा. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?, असा सवाल शेलार यांनी सरकारला विचारला.

आशिष शेलारांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं शेलार म्हणाले.

अजितदादांना क्लिनचिट म्हणजे आळी मिळी गुपचिळीचा हा प्रकार

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “अजित पवारांना क्लिनचिट म्हणजे आळी मिळी गुपचिळीचा हा प्रकार आहे. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अश्या पद्धतीने कारभार सुरू आहे हे सगळ्यांना माहितीय”

भाई जगताप आणि आशिष शेलार शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला एकत्र

राजकारण बाजूला ठेवून आशिष शेलार आणि मी आज एकत्र आज या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. इथे कोणत्याही राजकारणाचा लवलेश सापडत नाही. संपूर्ण देशभरात शिवजयंतीचा उत्साह आहे. सगळ्या धर्माच्या पंतांच्या लोकांना एकत्र आणण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

(BJP Ashish Shelar Answer Sanjay Raut)

हे ही वाचा :

विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं; महाराष्ट्रातही तसंच होईल: संजय राऊत