सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको, नाईट लाईफ हवे असणारे तुमच्यासोबत : चंद्रकांत पाटील

| Updated on: Mar 29, 2021 | 3:49 PM

ज्यांना नाईट लाईफ हवी आहे. ते तुमच्यासोबत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (Chandrakant Patil Criticizes Aditya Thackeray)

सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको, नाईट लाईफ हवे असणारे तुमच्यासोबत : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. काल (28 मार्च) संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. सरकारच्या या आदेशानुसार राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदीचा आदेश असणार आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. (Chandrakant Patil Criticizes Aditya Thackeray on Night life)

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत. नाईट कर्फ्यू लावायला आम्ही नकार देत नाही. नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे. ते तुमच्यासोबत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यावरुन त्यांनी अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? 

“कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. कोरोना संसर्गजन्य आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

“कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल,” असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (Chandrakant Patil Criticizes Aditya Thackeray on Night life)

“तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक जण काही ना काही तरी करुनच पोट भरतो. त्यांना तुम्ही काहीही दिलं नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“नाईट लाईफ हवी असणारे तुमच्यासोबत”

नाईट कर्फ्यू चालेल. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे, ते तुमच्यासोबत आहेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचं. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत. चाचण्या वाढवणं गरजेचे आहेत. ज्याला काहीही लक्षण नाहीत त्यांचेही टेस्टिंग करा. रुग्ण लवकर कळतील. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही. उपचाराची केंद्र वाढवा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.  (Chandrakant Patil Criticizes Aditya Thackeray on Night life)

संबंधित बातम्या : 

पवार-शहा भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा; संजय राऊतांचं ट्विट

शरद पवार रुग्णालयात, भाजप नेते म्हणाले, तुम्ही आधारवड, आता केंद्रीय मंत्र्याचाही तात्काळ फोन