कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही, मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावे, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु," असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला. (Chandrakant Patil comment on corona lockdown)

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही, मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावे, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
chandrakant patil

पुणे :“कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. कोरोना संसर्गजन्य आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु,” असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला. (Chandrakant Patil comment on corona lockdown)

“कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल,” असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

“तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक जण काही ना काही तरी करुनच पोट भरतो. त्यांना तुम्ही काहीही दिलं नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“नाईट लाईफ हवी असणारे तुमच्यासोबत”

नाईट कर्फ्यू चालेल. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे, ते तुमच्यासोबत आहेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचं. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत. चाचण्या वाढवणं गरजेचे आहेत. ज्याला काहीही लक्षण नाहीत त्यांचेही टेस्टिंग करा. रुग्ण लवकर कळतील. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही. उपचाराची केंद्र वाढवा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“शरद पवार-अमित शाह भेट होत राहतात’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अशा भेटी होतच राहतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या,अशाप्रकारचे भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही,पण दोघे तिकडे होते. अधिकृत माहिती मात्र नाही. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात,अशी भेट झालीच नाही असे राष्ट्रवादीकडून सांगत आहेत. काही सूचना वरिष्ठांकडून आली की ती मानायची असते. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्ष यांची भूमिका मान्य असेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.  (Chandrakant Patil comment on corona lockdown)

संबंधित बातम्या : 

“अजित पवारांना अर्थमंत्री असल्याचा विसर, मुख्यमंत्र्यांना सांगा लॉकडाऊन परवडणार नाही”

पवार-शहांची भेट झाली तर चूक काय?; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार चांगलं काम करतायत, पण भाजपला ‘ती’ संधी द्यायला नको होती’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI