महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज : चंद्रकांत पाटील

तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी 'टीव्ही9 मराठी'शी बोलताना दिली.

महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज : चंद्रकांत पाटील
| Updated on: Jul 19, 2020 | 3:44 PM

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील घटकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दूध दरवाढीसाठी भाजप एक ऑगस्टला आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Chandrakant Patil taunts Mahavikas Aghadi Parties need to have sleeping pills)

“महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिने आयोगाचे ऑफिस बंद आहे, हे दुर्दैव आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना हे ऑफिस बंद असणे चुकीचे आहे” असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला 20 जागा, आता जयंत पाटील म्हणतात..

दूध दरवाढीसाठी (Chandrakant Patil taunts Mahavikas Aghadi Parties need to have sleeping pills) भाजपने 1 ऑगस्टला आंदोलनासाठी तयारी सुरु केली आहे. डेअरीना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची भाजपची मागणी आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“आमचं आंदोलन हिंसक नसेल, अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे, असे त्याचे स्वरुप असेल” असे पाटील म्हणाले.