मुस्लीम मतं फोडणं भाजपचा कट, त्यात प्रकाश आंबेडकर सहभागी : अबू आझमी

मुस्लीम मतं काँग्रेसपासून फोडण्यासाठी भाजपचा कट सुरु आहे, ज्यात प्रकाश आंबेडकरही साथ देत आहेत, असं अबू आझमी (SP Abu Azmi) म्हणाले. एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यावर आझमी बोलत होते.

मुस्लीम मतं फोडणं भाजपचा कट, त्यात प्रकाश आंबेडकर सहभागी : अबू आझमी
| Edited By: | Updated on: Sep 16, 2019 | 6:30 PM

मुंबई : समाजवादी पक्षाचे (सपा) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (SP Abu Azmi) यांनीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाजपला मदत करत असल्याचा आरोप केलाय. मुस्लीम मतं काँग्रेसपासून फोडण्यासाठी भाजपचा कट सुरु आहे, ज्यात प्रकाश आंबेडकरही साथ देत आहेत, असं अबू आझमी (SP Abu Azmi) म्हणाले. एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यावर आझमी बोलत होते.

सपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीसोबत असेल. मतांचे विभाजन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे, असं आझमी म्हणाले. सपाकडून सात जागांची मागणी करण्यात आली आहे. शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व, भायखळा ही जागा आम्हाला हवी आहे. भायखळ्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. तीन जागांवर अजून चर्चा सुरु आहे, पण त्या मिळायला पाहिजे असा आमचा हट्ट नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आघाडीचं जागावाटप ठरलं

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील 288 जागांपैकी प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी कोणत्या जागा कोण लढवणार, अनेक आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे कोणते उमेदवार मैदानात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष असलेल्या आघाडीमध्ये मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार (Congress NCP Alliance Fixed), हे उत्सुकतेचं आहे.

धनंजय मुंडेंचाही वंचितवर आरोप

वंचित बहुजन आघाडीला मत देणं म्हणजे जातीयवादी भाजपला मदत करण्यासारखं आहे, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीत घेतला आहे. पुन्हा तीच चूक करून आपले मत वाया घालवू नका, जो लेक तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो, त्याला एकदा संधी द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं. परळी शहरातील भिमनगर भागातील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

वंचितला मत म्हणजे भाजपला मदत, तुमचं मत वाया घालवू नका : धनंजय मुंडे

अजित दादांचा ‘तो’ निर्णय शरद पवारांनी फेटाळला

सोडून जाणाऱ्यांच्या अंतःकरणात मी आहे असं ऐकतोय : शरद पवार