AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात, पण आपण जनतेचे सेवक आहोत- देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींना सुनावलं आहे. लोकप्रतिनिधींच्या कृतीवरून त्यांनी सुनावलंय.

लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात, पण आपण जनतेचे सेवक आहोत- देवेंद्र फडणवीस
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 03, 2022 | 11:41 AM
Share

तेजस मोहतुरे, TV9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकप्रतिनिधींना सुनावलं आहे. लोकप्रतिनिधींच्या कृतीवरून त्यांनी सुनावलंय. “लोकप्रतिनिधी (People Representative) लोकांना उत्तरदायी असला पाहिजे. त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणं हे त्याचं कर्तव्य असतं. पण एकदा लोकांनी निवडून दिलं की, लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात. पण आपल्या पंतप्रधानांनी सांगितलंय की, लोकप्रतिनिधी जनसेचे मालक नाहीत. तर जनतेचे सेवक आहेत. जनता आपली मालक आहे. त्यामुळे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा”, असं देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते सध्या भंडारा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जिल्ह्याच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, असंही ते बोललेत. काही योजनांची त्यांनी घोषणा केली.

भंडाऱ्यातील लक्ष्मी सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला तेव्हा त्यांनी संबोधित केलं.जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाही ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती राहणार आहेत.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांबरोबरची बेईमानी आमचं सरकार सहन करणार नाही. कायम शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असंही फडणवीस म्हणालेत.

शिवाय भंडारा -गोंदियात पर्यटन वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही फडणवीस म्हणालेत. फडणवीसांनी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकरांचं कौतुकही केलं आहे.

भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे समर्थक नरेंद्र बोंडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात शिंदे समर्थक आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या गळ्यात भाजपचं उपरणं पाहायला मिळालं.  फडणवीसांसह नरेंद्र बोंडेकर मंचावर उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलंय. शिवाय फडणवीसांनी बोंडेकरांचं कौतुकही केलंय.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप