काल मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले, आमचे भावी सहकारी, आज जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत!

| Updated on: Sep 18, 2021 | 1:02 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचा पुढचा अंक नंदुरबारमध्ये पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कारण आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत.

काल मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले, आमचे भावी सहकारी, आज जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत!
Devendra Fadnavis_Jayant Patil
Follow us on

नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचा पुढचा अंक नंदुरबारमध्ये पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कारण आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.

दरम्यान या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह खानदेशातील सर्वच राजकीय नेते उपस्थितीत राहणार आहेत.

स्व.पी. के. अण्णा पाटील यांनी शहादा तालुक्यात दूध संघ, साखर कारखाना, सूतगिरणी, तसेच उच्च शिक्षणासाठी कॉलेज स्थापन करून या भागाचा संपूर्ण कायापालट केला होता.

कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पेपर प्लँट आणि आदिवासी बांधवांना सोबत घेऊन स्टार्च फॅक्टरी काढली होती. त्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. म्हणूनच त्यांना सहकारमहर्षी म्हणून खान्देशात ओळखले जाते.

मुख्यमंत्री काल औरंगाबादमध्ये काय म्हणाले होते? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

संबंधित बातम्या  

आमचे भावी सहकारी ते रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता, उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!