‘मदर्स डे’ निमित्त पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट

| Updated on: May 10, 2020 | 1:51 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'मातृत्व' या आपल्या आवडत्या भूमिकेविषयी लिहिलं आहे. (Pankaja Munde Mothers Day Post)

मदर्स डे निमित्त पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट
Follow us on

मुंबई : दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. राजकीय नेते, अभिनेते यांच्यापासून सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिताना दिसतात. भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही ‘मदर्स डे’ निमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Pankaja Munde Mothers Day Post)

भाजपचे दिवंगत नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी पंकजा मुंडे अनेकवेळा आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. आईविषयीही अनेक वेळा त्यांनी हळवा कोपरा उलगडून दाखवला आहे. मात्र यावेळी त्यांनी ‘मातृत्व’ या आपल्या आवडत्या भूमिकेविषयी लिहिलं आहे.

“मला एकच मुलगा आहे, पण अनेकांनी; अगदी माझ्यापेक्षा मोठ्या लोकांनी मला ‘माते’ असे शुभेच्छा मेसेज केले. गंमत वाटली आणि छान वाटलं. प्रितम जन्मली, तेव्हा प्रथम मातृत्व जाणवलं. मग यशश्री, आर्यमन, मग सर्व. मला घरात ‘मा’ असंच म्हणतात. पूनमचा मुलगा, प्रीतमचा मुलगा, सर्व ‘मा’ म्हणतात. एक भूमिका माझी आवडती…’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दिग्गज नेत्यांकडून आईला वंदन :

(Pankaja Munde Mothers Day Post)