AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने फोडलेले चार पिता-पुत्र!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपने फोडलेले चार पिता-पुत्र!
| Updated on: Jul 31, 2019 | 1:05 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) , मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा रंगला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये कसं आणलं याबाबतची रणनीती सांगितली. आधी दिग्गज नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये प्रवेश दिला, त्यामुळे हे नेते आपोआप भाजपमध्ये आले, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं. सुजय यांना आधी पकडल्यामुळे राधाकृष्ण आले. तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने मधुकर पिचड सापडले, त्याशिवाय आधी रणजीतसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेतल्याने विजयसिंह मोहिते पाटील आपोआप आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

भाजपने फोडलेले बाप-लेक

  • सुजय विखे आणि वडील राधाकृष्ण विखे (काँग्रेसमधून भाजपमध्ये)
  • वैभव पिचड आणि वडील मधुकर पिचड (राष्ट्रवादीतून भाजपमध्ये)
  • रणजीतसिंह मोहिते पाटील आणि वडील विजयसिंह मोहिते पाटील (थेट भाजप प्रवेश नाही) (राष्ट्रवादीतून भाजपमध्ये)
  • संदीप नाईक आणि वडील गणेश नाईक (अद्याप भाजप प्रवेश नाही) (राष्ट्रवादीतून भाजपमध्ये)

मंदाताई चव्हाण, संदीप नाईक आणि सागर नाईक सर्व भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे  राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना आशीर्वाद द्यावाच लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे

  1. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड
  2. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड
  3. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले
  4. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक
  5. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
  6. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ
  7. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक
  8. महात्मा फुले यांच्या वंशज नीता हुले
  9. माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील

संबंधित बातम्या 

आधी सुजयला पकडलं, राधाकृष्ण सापडले, वैभवला पकडलं मधुकर पिचड मिळाले, मुख्यमंत्र्यांनी रणनीती सांगितली!   

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!   

शरद पवार बाजूला बसलेले, आमदार फोडाफोडीवर मुख्यमंत्री म्हणतात….  

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.