भाजपचा पाडेगाव परिसरातील जल आक्रोश मोर्चासाठी लावण्यात आल्याचा बॅनर अज्ञातांनी फाडला आहे. बॅनर फाडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रम झाले आहेत. मोर्चाच्या एक दिवस आधी बॅनर फाडल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : शहरात पाण्याचा प्रश्न (Water Crisis) अधिकच गंभीर बनला आहे. पाण्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवार (23 मे) रोजी भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यावरुन आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशावेळी शहरात भाजपकडून मोर्चासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र, भाजपचा पाडेगाव परिसरातील जल आक्रोश मोर्चासाठी लावण्यात आल्याचा बॅनर (Banner) अज्ञातांनी फाडला आहे. बॅनर फाडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रम झाले आहेत. मोर्चाच्या एक दिवस आधी बॅनर फाडल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.
चंद्रकांत खैरेंची फडणवीसांवर टीका
भाजपच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी भाजपचा खोडसाळपणा सुरु आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीस मोर्चा काढत आहेत. औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा भाजपचे लोक मुद्दाम विस्कळीत करत आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय.
पोलिसांकडून मोर्चाला परवानगी, 14 अटींची लिस्ट
कोणत्याही परिस्थिती मार्गात बदल नको
मोर्चात सहभागी होण्याऱ्यांनी शिस्त पाळावी
मोर्चा दरम्यान कोणतेही शस्त्र, स्फोटक पदार्थ सोबत ठेवू नयेत
मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची जबाबदारी संजोयकांची राहील
मोर्चात स्वयंसेवक नेमण्यात यावेत, त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, येणाऱ्यांची संख्या, लोकांची माहिती द्यावी
क्षमतेपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करू नका
मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचा पोलिसांना अधिकार राहणार
मोर्चात कोणात्याही प्रकराचे वंश, जात, धर्म, प्रदेश यांचा अपमान होईल असे वक्तव्य करू नये
मोर्चा दरम्यान ध्वनिक्षेपकांचा वापर करताना कायदाचा भंग करु नये
मोर्चा दरम्यान अत्याश्यक सुविधांना बांधा होणार नाही याची काळजी घ्यावी
वाहतूक विभागाकडून काढलेली नियमवाली मोर्चेकऱ्यांसाठी बंधनकारक
मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची सोय करावी
मोर्चात वापरण्यात येणाऱ्या विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, ध्वनीपेक्षक व्यवस्थीत असल्याची खात्री करा