Amit Shah : अमित शाह यांनी स्टेजवरच भाजपाच्या महिला नेत्याला तंबी दिली का? VIDEO व्हायरल

Amit Shah : एन चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपाच्या एका महिला नेत्यासोबत बोलताना दिसतायत. अमित शाह यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

Amit Shah : अमित शाह यांनी स्टेजवरच भाजपाच्या महिला नेत्याला तंबी दिली का? VIDEO व्हायरल
Amit Shahs talk with Tamilisai Soundararajan during N Chandrababu Naidu swearing in ceremony
| Updated on: Jun 12, 2024 | 6:07 PM

टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांचा आज शपथविधी झाला. त्यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. शपथ विधी सोहळ्यादरम्यानचा अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अमित शाह यांच्या चेहऱ्यावर थोडा राग दिसतोय. या व्हिडिओमध्ये अमित शाह हे तामिलसाई सौंदाराजन यांच्याशी बोलताना दिसतायत. तामिलसाई सौंदाराजन या तेलंगणच्या माजी राज्यपाल आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्यावरुन विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अमित शाह आणि तामिलसाई सौंदाराजन यांचे हावभाव कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. तामिलसाई यांनी स्टेजवर आल्यानंतर अमित शाह यांना नमस्कार केला. शाह यांच्या शेजारी एम. व्यंकय्या नायडू बसले होते. त्यांना सुद्धा नमस्कार केला. तामिलसाई पुढे गेल्यानंतर अमित शाह यांनी त्यांना मागे बोलावले. यावेळी दोघांमध्ये काहीतरी गंभीर चर्चा झाली. व्हिडिओमध्ये अमित शाह कुठल्यातरी विषयावरुन तामिलसाई सौंदाराजन यांना तंबी देतायत असं दिसतय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळे अंदाज लावत आहेत.


‘सगळे पाहणार हे अमित शाहना समजलं पाहिजे’

तामिळनाडू भाजपामध्ये जी अंतर्गत वादावादी सुरु आहे, त्याच्याशी या व्हिडिओचा संबंध जोडला आहे. तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के अन्नामलाई आणि तामिलसाई सौंदाराजन यांच्या समर्थकांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. तामिळनाडूमधील सत्ताधारी DMK ने या अंतर्गत वादावादीकडे लक्ष वेधलय. “हे कुठलं राजकारण आहे? तामिळनाडूच्या प्रसिद्ध महिला नेत्याची जाहीरपणे ही सौम्य भाषेत कानउघडणी केली जातेय का? सगळे पाहणार हे अमित शाहना समजलं पाहिजे. हे खूप चुकीच उदहारण आहे” असं द्रमुकचे प्रवक्ते सर्वन्ना अन्नादुराई म्हणाले.