बिहारमधील भाजपाचा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन : चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 11, 2020 | 2:13 PM

बिहारमध्ये भाजपा विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत केली, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  (Chandrakant Patil On  Bihar Election Results)

बिहारमधील भाजपाचा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन : चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : बिहारमधील जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचे समर्थन केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Chandrakant Patil On  Bihar Election Results)

“बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्याबद्दल मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि जनतेचे आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली हे यश मिळाले आहे. माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या बूथपातळीपासून संघटनात्मक बळकटीसाठी देशभर व्यापक मोहीम चालविली होती, त्याचा लाभ पक्षाला होत आहे,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

बिहारमधील भाजपाच्या जबरदस्त यशाबद्दल आपण पक्षाचे त्या राज्याचे निवडणूक प्रभारी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा, महाराष्ट्रतर्फे विशेष अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये भाजपाने जिंकलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस वाढ झाली. प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्या असताना भाजपाचे यश अधिक उठून दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपा विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत केली, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’, या सूत्रानुसार सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचा आहे. त्यांच्या या विकासाच्या राजकारणाचे बिहारसोबतच देशभरातील ठिकठिकाणच्या जनतेने समर्थन केले आहे.

कोरोना संकटात केंद्राने अनेकांना मदत केली 

कोरोनाच्या संकटात अनेक विकसित आणि श्रीमंत देश हतबल झाले आहे, मात्र भारताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महासाथीचा प्रभावी मुकाबला केला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोरगरीबांना आणि स्थलांतरित कामगारांना या संकटात मदत पोहोचवली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देशभर प्रभावी सेवाकार्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केले. या सर्वामुळे जनतेने भाजपाला निवडणुकीत पसंती दिली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले  (Chandrakant Patil On  Bihar Election Results)

संबंधित बातम्या :

संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे

Bihar Election ! सर्वात मोठा पक्ष तरीही तेजस्वी यादव सत्तेच्या खुर्चीपर्यंत का पोहचू शकले नाहीत?; ‘ही’ आहेत चार कारणे!