संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे

"बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील चित्र बदलायलाही वेळ लागणार नाही, लवकरच हे चित्र दिसेल" असं निलेश राणे म्हणाले

संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे
Nilesh Rane and Sanjay Raut
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:05 PM

रत्नागिरी : “शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं. बिहारच्या (Bihar Vidhansabha Election 2020) मुख्यमंत्रिपदावर बोलायचा शिवसेनेला (Shivsena) अधिकार काय?” असा सवाल माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विचारला. (Nilesh Rane slams Sanjay Raut over comment on Bihar CM)

“बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील चित्र बदलायलाही वेळ लागणार नाही. कारण महाविकास आघाडीबाबत असंतोष आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये हे चित्र दिसेल” असं निलेश राणे म्हणाले.

“बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. स्वतःचा कचरा कसा करायचा, यावर शिवसेनेने पीएचडी केली आहे. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेचा देशभरात कचरा झाला. इकडे तिकडे स्वतःचा कचरा करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेची कामं करावीत” असा बोचरा हल्लाही निलेश राणेंनी केला.

“ज्या राज्यात शिवसेना उभी राहते, त्या राज्यात शिवसेनेचा पराभव होतो. आता तरी शिवसेनेने यातून धडा घ्यावा आणि महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत करावं” असा सल्लाही निलेश राणेंनी दिला.

(Nilesh Rane slams Sanjay Raut over comment on Bihar CM)

संजय राऊतांवर हल्लाबोल

“बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेला बोलायचा अधिकार काय? बिहारमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं, ते मुख्यमंत्रिपदावरुन बोलणार. संजय राऊत यांना या विषयावर बोलण्याचा काय अधिकार? त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. संजय राऊत यांची किंमत काय आहे समाजामध्ये? संजय राऊत एकदा तरी समाजातून निवडून आले आहेत का? संजय राऊत यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवू देत. संजय राऊत आणि निवडणूक यांचा काही संबंध नाही” असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला.

“बिहार निवडणुकीमध्ये लालूप्रसाद यादव यांचा पक्ष जिंकणार, अशी हवा तयार करण्यात आली होती. पण ती हवा पुन्हा एकदा फुसकी निघाली. बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचं जंगलराज नाही हे त्यातून स्पष्ट होते” असंही निलेश राणे म्हणाले.

“राहुल गांधींना राजकारण जमत नाही हे बिहारच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झालं. राजकारणाची परिपक्वता लागते, उंची लागते, ती या निवडणुकीत राहुल गांधी यांच्यामध्ये दिसली नाही.” अशी टीकाही निलेश राणेंनी केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जे दिलं, त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळालं. लोकांच्या मनामध्ये भाजप आहे, कमळ आहे, म्हणून निवडणुका कुठल्याही राज्यात असू दे, त्याचा निकाल बीजेपीच्या बाजूने लागतो” असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या

“देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”, शिवसेनेला निलेश राणेंचा टोला

(Nilesh Rane slams Sanjay Raut over comment on Bihar CM)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.