Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे.

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला 'नोटा'पेक्षाही कमी मतं!

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए (BJP-JDU led NDA) बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची (Shivsena) कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही (None of the above – NOTA) कमी मतं मिळाली आहेत. (Bihar Election Result 2020 Shivsena got less votes than NOTA in most constituencies LIVE Updates)

बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली.

विशेष म्हणजे राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे. म्हणजेच शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघात शिवसेना डेंजर झोनमध्ये?

पालिगंज गया शहर वझीरगंज चिरैया मानेर फुलपरेश राघोपूर बेनिपूर मधुबनी तरैया अस्तवा औरिया कल्याणपूर बानमंखी ठाकूरगंज समस्तीपूर सराई मोरवा किशनगंज बहादूरगंज नरपतगंज मनिहारी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला आधी बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेने तीव्र नापसंती व्यक्त करत चिन्ह बदलून द्यावं अशी मागणी केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सुचवले होते. पण ही तिन्ही चिन्हं आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं बदलून दिलं.

नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या JDU ने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता. JDU ची निशाणी बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे कळवले होते. त्यानुसार सेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं मिळालं आहे.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

  • शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
  • एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
  • तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
  • चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
  • पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
  • एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
  • शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)

संबंधित बातम्या :

शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा

(Bihar Election Result 2020 Shivsena got less votes than NOTA in most constituencies LIVE Updates)

Published On - 2:22 pm, Tue, 10 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI