AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. (bjp leader chandrakant patil meets MNS supremo Raj Thackeray)

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 12:48 PM
Share

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. (bjp leader chandrakant patil meets MNS supremo Raj Thackeray)

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मीडियाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. राज यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली. दोघेही प्रवासात होतो. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचं निमंत्रण दिलं. चहा प्यायला बोलावलं होतं. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो. त्यांना प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावलं म्हणून गेलो. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली. परंतु, भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे विचार सांगणं हा या बैठकीचा विषय होता, असं पाटील यांनी सांगितलं.

ही निव्वळ सदिच्छा भेट

त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

राज यांनी भूमिका सांगितली

प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. नाशिकला ते ही जातात मी ही जातो. आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली. राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा असंही त्यांनी सांगितलं. यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी केला.

राज चहा प्यायला आले तर आनंदच होईल

कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच. या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही. विशेषता वहिनी जेव्हा आल्या त्या म्हणाल्या पुढल्यावेळी पत्नीला घेऊन या. त्यावर मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर पत्नीचं ऑफिस आहे. त्याही येतील, असं सांगतानाच राज ठाकरे माझ्या घरी चहा प्यायला आले तर मला आनंदच होईल, असंही ते म्हणाले.

नाशिकमध्ये भेटीचं ठरलं

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता. राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. (bjp leader chandrakant patil meets MNS supremo Raj Thackeray)

संबंधित बातम्या:

VIDEO: अखेर वेळा जुळल्या, राज ठाकरे-चंद्रकांतदादांची 15 मिनिटं खलबतं; चंद्रकांत पाटील म्हणतात…

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास, ते लिंक पाठवणार आहेत, भेटीनंतर चंद्रकांतदादांनी गप्पांचे डिटेल्स सांगितले

“काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात, मनसे-भाजप युती तर नाशिककरांसाठी नवीन नाही”

(bjp leader chandrakant patil meets MNS supremo Raj Thackeray)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...