अमरीश पटेलांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का: गिरीश महाजन

| Updated on: Dec 03, 2020 | 3:38 PM

काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मते फुटल्याने पटेल यांचा विजय सुकर झाला. | Dhule Nandurbar MLC bypoll election results

अमरीश पटेलांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का: गिरीश महाजन
Follow us on

मुंबई: धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीतील अमरीश पटेल (Amrish Patel ) यांचा विजय हा महाविकासआघाडीसाठी मोठा राजकीय धक्का असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्हाला 4-2 असा विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला. (BJP leader Girish Mahajan slams Mahavikas Aghadi govt after win in Dhule Nandurbar MLC bypoll election results 2020)

राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. धुळे-नंदुरबारमध्ये काँग्रेसची मते फुटल्यामुळे आमचा विजय झाला. या विजयामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना राजकीय धक्का नक्कीच बसणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच आम्हाला विधानपरिषद निवडणुकीत 4-2 असा विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटील यांचा सहजपणे पराभव केला. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मते फुटल्याने पटेल यांचा विजय सुकर झाला. अमरीश पटेलांच्या या विजयानंतर आता महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

महाविकासआघाडीत आता या पराभवाचे पडसादही उमटत आहेत. राष्ट्रवादीचे धुळ्यातील बडे नेते अनिल गोटे यांनी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजप उमेदवार अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत. त्यामुळे अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच. अमरिश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. अमरिश पटेल जरी भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष चालवतात. 50 हजार ते 1 लाखाचा भाव होता, असा घणाघाती आरोप गोटेंनी केला.

संबंधित बातम्या:

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे कल दुपारनंतर तर मध्यरात्री चित्र स्पष्ट होणार! काय आहे कारण?

(BJP leader Girish Mahajan slams Mahavikas Aghadi govt after win in Dhule Nandurbar MLC bypoll election results 2020)