Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली (Kirit Somaiya Corona Positive) आहे.

Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा
| Updated on: Aug 10, 2020 | 9:41 PM

मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Kirit Somaiya Corona Positive)

“मी आणि माझी पत्नी डॉ मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” असे ट्विट  किरीट सोमय्या यांनी केले आहे.

देशातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच 

दरम्यान राज्यात आज (10 ऑगस्ट) 9 हजार 181 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची  एकूण संख्या आता 5 लाख 24 हजार 513 इतकी झाली आहे.  तर आज  6 हजार 711 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 421 इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 735 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (Kirit Somaiya Corona Positive)

संबंधित बातम्या : 

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण