मुंबई: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कोरोना, आरोग्य सुविधा, नोकरभरती, संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त करत मी जबाबदार ही नवी घोषणा केली पण वाढत्या कोरोनाला कोण जबाबदार, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सामान्य जनता जबाबदारीने वागत असते. मंत्री मोर्चे काढतात, वाढदिवस साजरे करतात. (BJP leader Sudhir Mungantiwar slams MVA Government over various issues)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे. कोरोनाशी लढण्याचा ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कोरोना सारखं संकट असूनही राज्य सरकारनं आरोग्य खात्याचं बजेट वाढवलं नाही. राज्य सरकारनं 4 मे रोजी आरोग्य खात्यात नोकरभरती करण्यास परवानगी दिली. पण, त्यांनी तेव्हापासून काहीच पावलं उचलली नाहीत. हे सरकार मे 2020 पासून नोकरभरती करु शकलं नाही, असा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला.
सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व आरोग्य सुविधा संदर्भात तातडीने आणि नव्यानं आखणी करण्याची आवश्यकता आहे, असं म्हटले. सरकारने आता लेखानुदान मांडावे आणि त्यानंतर बजेट जुलैमध्ये अधिवेशनात मांडावे, असं ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सुरु असलेली ही नवीन परंपरा योग्य नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न झाले ते पोलिसांनी सांगितले पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणाले. ज्यांच्यावर आरोप आहेत तर ते स्वतः बद्दल कसे काय सांगू शकतात, असा सवाल देखील, मुनगंटीवार यांनी केला.
चित्रा वाघ यांनी थेट पोलिसांना लक्ष्य केले आहे. पुणे पोलीस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास नीट करत नाहीयेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जर राज्यातील मंत्र्यांकडे संजय राठोड यांचा पत्ता असेल तर तो त्यांनी पोलिसांना द्यावा असेही, आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी त्यांनी केली.
LIVE | महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/WZLaafXsN0
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या:
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात
पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार
(BJP leader Sudhir Mungantiwar slams MVA Government over various issues)