Pooja Chavan suicide | “पोलिसांचा तपास संदिग्ध, मंत्र्यांनी संजय राठोड यांचा पत्ता द्यावा”

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात पुणे पोलीस नीट तपास करत नाहीयेत, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

Pooja Chavan suicide | पोलिसांचा तपास संदिग्ध, मंत्र्यांनी संजय राठोड यांचा पत्ता द्यावा
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 5:05 PM

मुंबई :पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात पुणे पोलीस नीट तपास करत नाहीयेत. राज्यातले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी राठोड यांचा पत्ता पोलिसांना द्यावा,” असे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. तसेच, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणा पोलिसांनी अहवाल तयार केला आहे. वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी न करता, हा अहवाल पूर्ण होऊच कसा शकतो? असा सवालही त्यांनी केला. त्या मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. (Chitra Wagh criticizes state police and government on Pooja Chavan suicide case)

…तर राठोड यांचा पत्ता द्यावा

मागील अनेक दिवसांपासू पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जातंय. या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर त्यातला आवाज संजय राठोड यांचाच आहे, असा दावा चित्रा वाघ यांनी यापूर्वी केला होता. त्यांनतर राठोड यांच्या अटकेची मागणीसुद्धा त्यांनी केली होती. मात्र संजय राठोड अद्यापही माध्यमांसमोर न आल्याने अनेक प्रश्न निर्माण होतायत.

याविषयी बोलताना चित्रा वाघ यांनी थेट पोलिसांना लक्ष्य केले आहे. पुणे पोलीस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास नीट करत नाहीयेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जर राज्यातील मंत्र्यांकडे संजय राठोड यांचा पत्ता असेल तर तो त्यांनी पोलिसांना द्यावा असेही, आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी त्यांनी केली.

अहवालावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, पूजा चव्हाणचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला असला तरी, हे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. पूजाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी भाजपने सरकारवर धारेवर धरलं होतं. त्यांनतर तपासाची सूत्रं हालली होती. त्यांनतर पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. मात्र, या अहवालावरही चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला होता. वन मंत्री संजय राठोड यांची चौकशी न करता हा अहवाल केलाच कसा? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, संजय राठोड यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत या अहवालाला काडीचीही किंमत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या :

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

(Chitra Wagh criticizes state police and government on Pooja Chavan suicide case)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.