Sushil Modi : भाजपाचे मोठे नेते सुशील मोदी यांना कॅन्सर, पीएम मोदींना दिली माहिती

भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांना कॅन्सरची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: दिली. राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख आहे. सुशील मोदी यांनी बरेच दिवस आपल्या आजारपणाबद्दल कोणाला काही समजू दिलं नाही.

Sushil Modi : भाजपाचे मोठे नेते सुशील मोदी यांना कॅन्सर, पीएम मोदींना दिली माहिती
Sushil Modi
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 03, 2024 | 12:56 PM

भाजपा नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कॅन्सर झाला आहे. त्यांनी स्वत: ही माहिती दिली. मागच्या 6 महिन्यांपासून मी कॅन्सरशी सामना करतोय, असं त्यांनी सांगितलं. असं वाटलं की, आता लोकांना सांगण्याची वेळ आलीय. लोकसभा निवडणुकीत मी काही करु शकणार नाही. पंतप्रधानांना सगळ काही सांगितलय. देश, बिहार आणि पार्टीचा नेहमीच आभारी राहीन.

सुशील मोदी यांनी दीर्घकाळ बिहारच उपमुख्यमंत्री पद भूषवलय. (2005-2013 ते 2017-20) बिहारच्या राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख आहे. नीतीशकुमार यांच्यासोबत त्यांचा खूप चांगला समन्वय होता. त्यांची जोडी विशेष गाजली. कॅन्सरमुळे मागच्या काही महिन्यांपासून ते राजकारणापासून लांब आहेत.


भाजपासाठी मोठा धक्का

सुशील मोदी यांनी बरेच दिवस आपल्या आजारपणाबद्दल कोणाला काही समजू दिलं नाही. आता त्यांनी कॅन्सरशी झुंज सुरु असल्याच सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार भाजपासाठी हा एक धक्का आहे. पार्टीमध्ये सुशील कुमार मोदी आधी खूप सक्रीय होते. सुशील कुमार मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री असण्याशिवाय राज्यसभा खासदार सुद्धा होते. मागच्या तीन दशकाच्या सार्वजनिक जीवनात राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधान सभेसह चारही सदनाचे सदस्य होते.