पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल

| Updated on: Aug 13, 2019 | 8:23 PM

दुसरा टप्पा 21ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होत असल्याची माहिती यात्रा (Mahajanadesh Yatra) प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातील यात्रा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली होती.

पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल
Follow us on

उस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा (Mahajanadesh Yatra) पूर्वनियोजित दुसरा टप्पा 5 दिवस पुढे ढकलला आहे. दुसरा टप्पा 21ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होत असल्याची माहिती यात्रा (Mahajanadesh Yatra) प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातील यात्रा मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली होती.

महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे , 55 मतदारसंघात जाणार आहे. यात 39 जाहीर सभा, तर 50 स्वागत सभा होतील. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार असून समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार असल्याचं आमदार ठाकूर म्हणाले. सांगली, कोल्हापूर येथील पूरस्तिथीमुळे 3 दिवस अगोदरच पहिला टप्पा बंद झाला होता, जो आता सुरू होणार आहे.

पूरग्रस्त भाग असलेले पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले असल्याची माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी दिली. यापूर्वी 17 तारखेपासून दुसरा टप्पा सुरु होणार होता आणि 31 ऑगस्टला महाजनादेश यात्रेचा समारोप होणार होता. पण राज्यातील पूर परिस्थितीची आपत्ती लक्षात घेत या दौऱ्याच्या नियोजनात बदल करण्यात आलाय.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 6 ऑगस्टला अकोला येथे जाहीर सभेनंतर दौऱ्याचा पहिला टप्पा सोडला होता. 09 ऑगस्टला दौऱ्याचा पहिला टप्पा नंदुरबार येथे संपणार होता. पण कोल्हापूर, सांगलीमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण पूरपरिस्थितीसाठी विशेष बैठक आणि मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री मुंबईत परतले. मुख्यमंत्री मुंबईत परतले त्या रात्री भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं होतं.