महाराष्ट्रात भाजपला पाच उपाध्यक्ष, पक्षाकडून नेत्यांची नावंही जाहीर

| Updated on: Aug 19, 2019 | 8:48 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भाजपला पाच उपाध्यक्ष, पक्षाकडून नेत्यांची नावंही जाहीर
Follow us on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाच्या नियुक्त्या (BJP New appointments) जाहीर केल्या आहेत. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि खासदार सुभाष भामरे, माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या, योगेश गोगावले (पुणे) आणि अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल (BJP New appointments) करण्यात आले आहेत.

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यातील माध्यमांच्या संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मधू चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरीष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपमधील महत्त्वाच्या नियुक्त्या

प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर, उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर

पुणे शहराध्यक्ष – माधुरीताई मिसाळ

पुणे शहर सरचिटणीस – गणेश बिडकर

जालना जिल्हाध्यक्ष – आमदार संतोष दानवे

नाशिक शहराध्यक्ष – गिरीश पालवे

यवतमाळ जिल्हाध्यक्ष – नितीन भुतडा

दरम्यान, अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे काही पदाधिकाऱ्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचंही भाजपकडून सांगण्यात आलंय. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील आणि रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर आणि व्यापारी आघाडीचे दिलीप कंदकुर्ते यांच्या नावाचा समावेश आहे.