भाजप नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश, नरेंद्र मेहतांना दिलासा मिळण्याची शक्यता

नीला तनेजा यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याच्यावर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजप नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश, नरेंद्र मेहतांना दिलासा मिळण्याची शक्यता

मुंबई : मीरा-भाईंदरच्या भाजप नगरसेविका नीला तनेजा-सोन्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी तनेजा यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (BJP Corporator Neela Taneja Soans Caste Certificate found fraud)

नीला तनेजा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र बनवले असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. तनेजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.

नीला तनेजा यांनी मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर मेहतांवर बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता तनेजा यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरल्याने नरेंद्र मेहता यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून दिलासा मिळू शकतो. तनेजा यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

काय आहेत आरोप? 

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मीरा-भाईंदरच्या भाजप नगरसेविका नीला तनेजा-सोन्स यांनी केला होता. मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोपही नीला तनेजा सोन्स यांनी केला होता.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय न मिळत नसल्याचे सांगत त्यांनी पोलिसात धाव घेतली होती. नीला यांच्या तक्रारीनंतर नरेंद्र मेहतांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(BJP Corporator Neela Taneja Soans Caste Certificate found fraud)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *