…तर आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, महाजनांचा सरकारला इशारा

| Updated on: Jan 27, 2020 | 8:50 PM

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी सुद्धा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, चिंतामुक्त करु अशी घोषणा देणाऱ्या सरकारने अद्याप काहीही केलेलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले

...तर आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, महाजनांचा सरकारला इशारा
Follow us on

जळगाव : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कामं रखडल्याच्या कारणावरुन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपोषण सुरु केले (Pankja Munde Protest). त्यातच आता भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी सुद्धा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, चिंतामुक्त करु अशी घोषणा देणाऱ्या सरकारने अद्याप काहीही केलेलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले (Girish Mahajan Criticise Govt).

“शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, अशा घोषणा करत महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, हे सरकार स्थापन झाल्यापासून अद्याप कर्जमाफीची रक्कम आणि दुष्काळ निधीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यात भर म्हणून या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग सुरु झाल्याने शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याची घोषणा करणारं हे सरकार शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करत आहेत”, असा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या सरकारने तातडीने सोडवल्या नाहीत, तर भाजपला राज्यभरात रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आता गिरीश महाजनही आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंचं उपोषण 

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या औरंगाबादेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं.