AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी हसले, उत्तर टाळलं, बावनकुळेंना भेटताच जाहीर दिलगीरी; विधानभवन राड्यावर पडळकर काय म्हणाले?

विधानभवनात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. आता पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

आधी हसले, उत्तर टाळलं, बावनकुळेंना भेटताच जाहीर दिलगीरी; विधानभवन राड्यावर पडळकर काय म्हणाले?
gopichand padalkar vs jitendra awhad
| Updated on: Jul 17, 2025 | 7:43 PM
Share

विधानभवनात एकीकडे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात लोकहितासाठी वेगवेगळे मुद्द्यांवर सखोल चर्चा होत आहे. असे असतानाच दुसरीकडे याच विधानभवनात गुंडांसारखी मारामारी पाहायला मिळाली आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी आव्हाड यांच्या कार्यकर्त्याचे शर्ट फाडण्यात आले, शिविगाळ करण्यात आली. या प्रकरणाची सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील पक्षाच्या सर्वच शीर्षस्थ नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. असे असतानाच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेताच पडळकर यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केलीय. याआधी मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते हसत हसत निघून गेले होते.

अगोदर नेमकं काय घडलं होतं?

विधानभवनात आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतर एकच गदारोळ उडाला. या मारामारीत आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण झाली. त्यांचे शर्ट फाडण्यात आले. तसेच शिवीगाळही करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. इथं आमदारच सुरक्षित नाहीत म्हटल्यावर कसं होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे गुंड मला मारण्यासाठीच आले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. काही वेळाने त्यांनी घडलेली सर्व घटना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली. बावनकुळे यांनीही आव्हाडांचं मत गांभीर्याने ऐकून घेतलं.

कठोर कारवाईची फडणवीसांची भूमिका

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात अशा घटना घडणं चुकीचं आहे. हे क्षेत्र विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अधिकारक्षेत्रात येतं त्यामुळे त्यांनी घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी भूमिका घेतली. या सर्वच घडामोडींनंतर फडळकर यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

पडळकर नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, पडळकर यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानभवनाच्या प्रांगणात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून मला या घटनेबद्दल अत्यंत दु: आहे. हा परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अधिकारक्षेत्रात आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. तसे या प्रकरणात आमच्या सर्व नेतेमंडळींशी चर्चा करून माजी सविस्तर भूमिका मांडतो, असे पडळकर यांनी म्हटले आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....