निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंकडून कौतुक

| Updated on: May 21, 2021 | 1:19 PM

भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. (Shweta Mahale Nilesh Lanke )

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंकडून कौतुक
निलेश लंके, श्वेता महाले
Follow us on

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कोव्हिड सेंटर उभारुन कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale Patil) यांनी नुकतीच या कोव्हिड सेंटरला भेट दिली. यावेळी महाले यांनी लंकेंचं काम राज्यात आदर्शवत असल्याचं सांगत कौतुक केलं. भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. (BJP MLA Shweta Mahale Patil goes all praises NCP MLA Nilesh Lanke Foundation COVID Centre in Ahmednagar Parner)

काय म्हणाल्या श्वेता महाले ?

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोव्हिड सेंटर उभारले आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी त्याला भेट दिली. “आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचा चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत” अशा शब्दात श्वेता महाले यांनी निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. विरोधीपक्ष भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

कोण आहेत आमदार श्वेता महाले?

श्वेता महाले पाटील या बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत

भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला

2004 नंतर चिखली मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराचा इथे विजय झाला

श्वेता महाले या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती होत्या

त्यांना भाजपने 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट दिलं होतं

श्वेता महाले मिळालेल्या संधीचं सोने करुन विधानसभेत पोहोचल्या

(Shweta Mahale Nilesh Lanke )

निलेश लंके यांचं डोंगराएवढं काम

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खिशात एक रुपयाही नसताना, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याची किमया केलीये. सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे लोकवर्गणीतून आमदार झाले. त्यांच्यात लहानपणापासूनच समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती आहे. हे सर्व काम करत असताना ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाले आणि थेट आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, हे शक्य झालं त्यांच्या इच्छाशक्तीमुळे.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

मुलींना नग्न करुन व्हिडीओ काढतात, रक्षकच भक्षक कसे बनले, श्वेता महाले कडाडल्या

VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

(BJP MLA Shweta Mahale Patil goes all praises NCP MLA Nilesh Lanke Foundation COVID Centre in Ahmednagar Parner)