महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाला धक्का पोहोचवणारी मिटकरी-पडळकरांची टपोरी भाषा

BJP MLC Gopichand Padalkar vs NCP MLC Amol Mitkari : गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी यांनी एकमेकांसाठी जी भाषा वापरलीय, त्यावरुन हे महाराष्ट्राचे आमदार आहेत का असा प्रश्न पडतो.

महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाला धक्का पोहोचवणारी मिटकरी-पडळकरांची टपोरी भाषा
Gopichand Padalkar_Amol Mitkari
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 12:59 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाला धक्का पोहोचवणारी भाषा भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Gopichand Padalkar vs Amol Mitkari) यांनी केली आहे. शिव-शाहू- आंबेडकरांचं नावं घेऊन राजकारण करणारे, यशवंतराव चव्हाणांचा दाखला देणाऱ्या महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी यांनी एकमेकांसाठी जी भाषा वापरलीय, त्यावरुन हे महाराष्ट्राचे आमदार आहेत का असा प्रश्न पडतो. पाण्याच्या नळावर होणारी भांडणंही यांच्यापुढे फिकी पडतील अशी भाषा या दोघांनी वापरली.

जेजुरी गडावर अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Statue Jejuri) यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या 13 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याआधी आजच या पुतळ्याचं अनावरण मेंढपाळ्यांच्या हस्ते केलं. पुतळ्याचं अनावरण जाणीवपूर्वक रखडवल्याचा आरोप करत, गोपीचंद पडळकर यांनी हे अनावरण उरकून घेतलं. याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत टीव्ही 9 मराठीने गोपीचंद पडळकर यांना आणि राष्ट्रवादीची बाजू जाणून घेण्यासाठी आमदार मिटकरींशी संपर्क साधला. दोघांचीही फोनवरुन लाईव्ह प्रतिक्रिया घेतली. त्यावेळी मिटकरी आणि पडळकर यांनी जी भाषा वापरली ती महाराष्ट्राच्या आमदाराला शोभणारी नव्हती.

कट्टर विरोधक असले तरी महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेते एखाद्या कार्यक्रमासाठी मतभेद विसरुन एकत्र आल्याचं देशाने पाहिलं आहे. वेळोवेळी विविध राज्यातील नेत्यांनी ते बोलूनही दाखवलं आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे. टोकाचा विरोध असला तरी पातळी सोडायची नाही, ही यशवंतरावांची शिकवण शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडेपासून ते आता नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यापर्यंत सर्वांनी पाळली. मात्र गोपीचंद पडळकर असो की अमोल मिटकरी या नव्या दमाच्या आमदारांनी, हाच यशवंतरावांचा वारसा आज पायदळी तुडवला असं म्हटलं तर गैर ठरणारं नाही.

गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी एकमेकांना काय म्हणाले? संवाद जसाच्या तसा

गोपीचंद पडळकर – अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्तानात आहे. इतिहासात नोंद घेणारं त्यांचं काम आहे. त्यांचं मंदिराच्याबाबत जिर्णोद्धार असो, प्रजाहितकारी म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचं अनावरण हे चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. परंतु ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवारांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहे. त्यामुळे आम्ही युवा मित्रांनी मेंढपाळ्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पहाटे केलं.

प्रश्न – तुमच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे.

गोपीचंद पडळकर – अ अहिल्यादेवींचा अपमान जिथे होत असेल, तिथे आम्ही यापेक्षा तीव्रपणे काम करु. ज्यांना गुन्हे दाखल करायचे आहेत ते करु द्या. पवारांनी आतापर्यंत गुन्हे घालणं हेच केलं. त्यांचं मी स्वागत करतो. त्यांनी मला जेलमध्ये टाकावं, मला काहीच फरक पडत नाही. मला शिक्षा करावी, पण अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पवारांच्या कुटुंबातील कुणीच लावू नये अशी आमची भूमिका यापूर्वीही राहिली आहे, यापुढेही राहील.

प्रश्न – पण एवढा राग का?

गोपीचंद पडळकर – अ गेल्या तीन महिन्यांपासून जे यशवंतराव होळकर इंग्रजांविरोधात लढले, १८ वेळा इंग्रजांना हरवले, त्यांचा जो वाडा आहे, तो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. हा वाडा सरकारच्या ताब्यात करावा ही मागणी मी सभागृहात केली होती. सरकारने त्याचं संवर्धित स्मारक म्हणून जाहीर करुन डागडुजी करावी. पण रयतचे अध्यक्ष शरद पवार त्यावर बोलत नाहीत, त्यांना होळकरांच्या वास्तू नेस्तनाबूत करायच्या आहेत. होळकरांचा इतिहास त्यांना ठेवायचा नाही. दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी संस्थानाने जो पुतळा बांधला आहे, त्यामध्ये राजकारण करत आहेत, जातीवाद करत आहेत. होळकरांचे वारस इथे पूर्वीपासून आहेत. पवारांनी घराघरात भांडणं लावली. आता ते होळकरांच्या घरात लावत आहेत.

प्रश्न – याबाबत आपण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना विचारु

अमोल मिटकरी : गनिमी कावा म्हणून तुम्ही मावळ्यांचा अवमान करु नका. गनिमी कावा हे मुस्तदी मावळेच करायचे. गोपीचंद पडळकरांना तितकी अक्कल असेल असं वाटत नाही. गोपीचंद पडळकर ही वृत्ती नाही तर प्रवृत्ती आहे. एखादा माणूस पिसाळल्यावर जसं बोलतो त्याचं उदाहरण हे पडळकर आहेत. यांनी आम्हाला अहिल्यामाई होळकर यांच्याबद्दल सांगू नये. हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. शरद पावारांची भूमिका ही र्वसमावेश राहिलेली आहे. एखाद्या चोरासारखं जाणं, पुतळ्याचं अनावरण करणं म्हणजे मीच कसा अहिल्यामाईंचा वारसदार आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आताच्या काळातले हे शिशुपाल आहेत. एखादा वाचाळवीर तोंडात येईल तसा बरळतो, तसं हे बरळतात त्यामुळे यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही

गोपीचंद पडळकर – अ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं भाषण गोरगरिबांना महाराष्ट्रात 1 लाख रुपयांना विकणारा हा माणूस आहे. भाषण विकण्यासाठी या माणसाने चार पुस्तकं वाचली आहेत.

अमोल मिटकरी :ए..ए.. आरे तुरेची भाषा कुणाला करतोय. भाषी नीट वापर. जरा नीट बोलतो. तू दिलेत का मला पैसै. पैसे घेऊन भाषण केल्याचा एक तरी पुरावा या पडळकरने दाखवावा. तुझ्यासारखा मी समाज विकला नाही. भाषा नीट वापर जरा. तुझ्यासारख्या शिशुपालाने मला सांगण्याची गरज नाही. तू पाहिलं का मला पैसे घेताना. गोपीचंद भाषा नीट वापर…

गोपीचंद पडळकर – अमी भाषा नीटच वापरतोय. असल्या बाजारु विचारवंतानी मला सल्ला देण्याची गरज नाही. मी सक्षम आहे.

मिटकरी- याला पिवळ्या रोग झाला आहे. त्यामुळे हा असल्या वाह्यात गोष्टी करतोय. हा एक दिवस संपूर्ण भाजप बुडवणार आहे.

गोपीचंद पडळकर – अतुम्हालाच पिवळ्या रोग झाला असेल. या रोगामध्ये राष्ट्रवादी संपणार आहे. हे लक्षात ठेवा. जातीयवादी राष्ट्रवादी यात संपणार आहे. हे लक्षात ठेवा. हे सारं संपूर्ण माहाराष्ट्र पाहतो आहे. असल्या विचारांची महाराष्ट्राला गरज नाही. आम्ही सक्षम आहोत.

मिटकीर- माझ्यासोबत जास्त मस्तीची भाषा करायची नाही. हा एक दिवस पूर्ण भाजप बुडवणार आहे. गोपीचंद पडळकरनी 1 लाख रुपये देऊन व्याख्यान देतो, हे सिद्ध करुन दाखवावं.

गोपीचंद पडळकर – अ ये नीट बोल. आरे तुरे कोणाला करतोय. नीट बोल.

अमोल मिटकरी : चोरांसारखे धंदे बंद करा. पवार साहेबांची बरोबरी करायला कित्येक जन्म घ्यावे लागतील.

गोपीचंद पडळकर – अ पवार साहेबांना सांग की यशवंतरावांचा वाडा हा सराकरडे द्या म्हणून. होळकरांच्या सगळ्या वास्तू नेस्तनाबूत करण्याचा उद्योग तुम्ही करत आहात.

अमोल मिटकरी : होळकराचा वारसा काय एका फक्त पडळकर नावाच्या शिशुपालानेच घेतलाय का?

गोपीचंद पडळकर – अ आरे आम्ही होळकरांचे वारस आहोत. आम्ही तुमचा डाव उधळतो आहोत. तुमचं षडयंत्र आम्ही उद्ध्वस करतो आहोत.

अमोल मिटकरी :आम्ही पण होळकरांचे वारस आहोत. तू आम्हाला शिकवायची गरज नाही मल्हाररावांचा इतिहास. डिपॉझिट जप्त झालंय ना बारामतीमध्ये. यावरुन लायकी समजून यायला पाहिजे. तरी बेशरमासारखी आमदाराची पदं पदरात पाडून घेतात. डिपॉझिट जप्त होऊनही. स्वाभिमान असता तर हिमालयात जाऊन बसला असता तिथे.

गोपीचंद पडळकर – अडिपॉझिट हे लोकं घालवतात. तू कधी लढलास निवडणूक. कुठल्यातरी समाजाला शिव्या द्यायच्या आणि आरेरावी मिरवायची असले धंदे आम्ही करत नाही.

अमोल मिटकरी : आरेरावी नाही. आहिल्यामाई होळकर यांचा इतिहास आम्हाला शिकवू नका. आमच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा धनगर समाजाला या मिटकरीने नेतृत्व दिलं आहे. तू वारसा शिकवायची गरज नाही. ज्याचे डिपॉझिट जप्त झालंय त्याने सन्यास घ्यावा. हे चोरासारखे धंदे बंद करावे. नाहीतर समाज माफ करणार नाही.

गोपीचंद पडळकर – अ पवारांच्या छाताडावर उभं राहून मी निवडणूक लढवली आहे. माझं डिपॉझिटजरी जप्त झालं असेल, तरी मी लेचापेचा नाही.

अमोल मिटकरी : तुझी औकात किती?,तू बोलतोस किती.

गोपीचंद पडळकर – अमाझी औकात लोकांना माहिती आहे. तुझी औकात काय त्याचं बघ तू.

अमोल मिटकरी : तू कोणाला बोलतयोस, कोणाबद्दबल बोलतोस. तुझं डिपॉझिट जप्त झालंय. तू काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय.

गोपीचंद पडळकर – अ ये.. कोणाला आरोतुरे बोलतोस तू. तुझ्यासारख्या बाजारू लोकांची मला गरज नाही.

अमोल मिटकरी : बिरोबाची शपथ घेऊन तू समाजाला भुलवलंस. समाज तुला कधी माफ करणार नाही. धुमस जो आहे तो फ्लॉप झालाय, तुझी लायकी समजतीय

गोपीचंद पडळकर – अमाझा समाज मला बघून घेईल. तुझ्यासारख्यांना मला सांगायची गरज नाही.

अमोल मिटकरी :आरे जा.. जा… तुझ्यासारखे 56 पाहिलेत. तू काय बोलतं, छाताडावर उभं राहायची भाषा करतो का?,

गोपीचंद पडळकर – अतुम्हा सगळ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय कुठं जात नाही. तू टेन्शन नको घेऊ.

अमोल मिटकरी :असे बोलणारे भरपूर पाहिले. जरा नीट बोल. भाषा जरा नीट वापर

गोपीचंद पडळकर – अअरे तू कोणाशी बोलतोय. तू आरेतुरे बोलला. मी आरेतुरे बोलत नाही. तू कोण लागून गेला.

अमोल मिटकरी : तू कोणाशी बोलतोय, कोणाविरुद्ध बोलतोय? तुझ्यासारखे लोक महाराष्ट्राला लागलेले कलंक आहेत.

अँकर – तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, दोघांनी भाषाची मर्यादा ठेवायला हवी.

गोपीचंद पडळकर – अयाला सांगा ना आधी आरेतुरे बोलायचं आणि परत बोललं तर काय

मिटकरी –

VIDEO :

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.